Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

NEET परीक्षा लिक प्रकरण : सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा तीव्र आक्रोश

mosami kewat by mosami kewat
June 20, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
NEET परीक्षा लिक प्रकरण : सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा तीव्र आक्रोश
       
पुणे : पुणे विद्यापीठात शुक्रवारी (दि. १९) नीट पेपरफुटी विरोधात वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश प्रवक्ते प्रशांत बोराडे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व NEET ची जबाबदारी NTA कडून काढून UPSC कडे देण्यात यावी या मागण्यांसह केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टिका केली.

तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या विद्यार्थी नेत्यांनी मोदी सरकार व शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणाचा बाजार मांडल्याची सडकून टीका केली. तसेच भाजपच्या निवेदिता एकबोटेंच्या पुण्यातील माॅडर्न महाविद्यालयातच नीट पेपर फुटी व प्रेम बिर्हाडे सारखे गंभीर प्रकरण कसे काय घडते? असा गंभीर प्रश्न करत निवेदिता एकबोटे, शिक्षिका मनीषा मांढरे व माॅडर्न महाविद्यालयाच्या भ्रष्टाचारी व जातीयवादी प्रशासनावर गंभीर टिका केली.

वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ॲड.अरविंद तायडे यांनी नीट पेपरफुटीने आत्महत्या केलेल्या १४ विद्यार्थ्यांचा जीव घेतला असून यामुळे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची गंभीर मागणी केली.

तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पुणे शहर महासचिव अभिषेक कांबळे यांनी NEET ची जबाबदारी NTA कडून काढून UPSC कडे द्यावी आणि NEET  पेपरफुटीमुळे ग्रस्त २३ लाख विद्यार्थ्यांच्या हितासाठी Public Examination (Prevention of Unfair Means Act 2024) ची अंमलबजावणी करावी.तसेच नीट पेपरफुटीच्या पीडीत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलन पीडीत विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या संघर्षा संखद यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान व NTA च्या भ्रष्टाचारी कारभारावर सडकून टीका केली. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा सहभाग होता. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

Tags: EducationNeet ExamNEET Paper LeakNEET ScampuneSavitribai Phule Pune University
Previous Post

परीक्षा व्यवस्थे विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Next Post

मुंबईतील नागरी समस्यांबाबत वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट

Next Post
मुंबईतील नागरी समस्यांबाबत वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट

मुंबईतील नागरी समस्यांबाबत वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गोड साखरेची कडू कहाणी ; साखरेच्या दरवाढीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर आक्रमक 
बातमी

गोड साखरेची कडू कहाणी ; साखरेच्या दरवाढीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर आक्रमक 

by mosami kewat
August 22, 2026
0

जनतेने लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर आंदोलन करण्याचे आवाहन औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता...

Read moreDetails
राम माधव यांच्या ISI अधिकाऱ्यांसोबतच्या भेटीवरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल; मोहन भागवतांकडे खुलाशाची मागणी

राम माधव यांच्या ISI अधिकाऱ्यांसोबतच्या भेटीवरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल; मोहन भागवतांकडे खुलाशाची मागणी

August 22, 2026
मनमाडमध्ये सार्वजनिक जागेवर खाजगी टर्फ उभारण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; उद्घाटनास विरोध करण्याचा इशारा

मनमाडमध्ये सार्वजनिक जागेवर खाजगी टर्फ उभारण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; उद्घाटनास विरोध करण्याचा इशारा

August 22, 2026
आदिवासी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयांवर कारवाई करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

आदिवासी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयांवर कारवाई करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

August 22, 2026
अखेर वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेनंतर यवतमाळ नगर परिषदेची माघार!

अखेर वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेनंतर यवतमाळ नगर परिषदेची माघार!

August 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home