Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

औरंगाबादमध्ये स्मार्ट मीटर सक्तीचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू – रुपचंद गाडेकर

mosami kewat by mosami kewat
June 18, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
औरंगाबादमध्ये स्मार्ट मीटर सक्तीचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू – रुपचंद गाडेकर
       

औरंगाबाद : महावितरणकडून वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज महावितरणचे मुख्य अभियंता कुठेकर यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या पद्धतीने त्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांनी दिला.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून महावितरणकडून वीज ग्राहकांना संदेश पाठवून ४८ तासांच्या आत जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्यात येणार असल्याची माहिती दिली जात आहे. मात्र अनेक ग्राहकांमध्ये यामुळे संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रुपचंद गाडेकर म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत राज्यातील कोणत्याही वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नसल्याचे स्पष्ट आश्वासन दिले होते. असे असताना महावितरणच्या नावाने ग्राहकांना स्मार्ट मीटरबाबत सक्तीचे संदेश पाठविले जात असल्याने शासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत.

महावितरणने तात्काळ ग्राहकांपर्यंत स्पष्ट भूमिका पोहोचवून स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नसल्याचे जाहीर करावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर स्मार्ट मीटरची होळी करून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, शहराध्यक्ष पंकज बनसोडे, जिल्हा महासचिव प्रविण हिवाळे, अंजन साळवे, जिल्हा संघटक राजन किर्तने, जिल्हा सचिव उमेश सरदार, रामदास नाना वाघमारे, इक्बाल भाई, युवा शहराध्यक्ष (पश्चिम) राहुल मकासरे, प्रसिद्धी प्रमुख भावी गवई, जिल्हा सदस्य अंकुश जाधव, बबलू बागवान यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: MaharashtraPoliticalSmart Meter
Previous Post

पुण्यात उद्या विद्यार्थी आक्रोश मोर्चा: NTA रद्द करा ; शिक्षणमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा

Next Post

सेवलीला अप्पर तहसील कार्यालय न मिळाल्याने ‘वंचित’ आक्रमक; सेवलीत एकदिवसीय धरणे आंदोलन

Next Post
सेवलीला अप्पर तहसील कार्यालय न मिळाल्याने ‘वंचित’ आक्रमक; सेवलीत एकदिवसीय धरणे आंदोलन

सेवलीला अप्पर तहसील कार्यालय न मिळाल्याने 'वंचित' आक्रमक; सेवलीत एकदिवसीय धरणे आंदोलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; दोन जण जखमी
बातमी

Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; दोन जण जखमी

by mosami kewat
October 18, 2026
0

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुहू येथील पुष्पा पार्क परिसरात ही...

Read moreDetails
साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्तक्षेपानंतर सुटका

साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्तक्षेपानंतर सुटका

October 18, 2026
आझाद समाज पार्टीला नाशिकमध्ये खिंडार! जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे संपूर्ण संघटनेसह वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर!

आझाद समाज पार्टीला नाशिकमध्ये खिंडार! जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे संपूर्ण संघटनेसह वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर!

October 18, 2026
ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात!  ट्रकच्या धडकेत १४ भाविक ठार, २९ जण जखमी

ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात!  ट्रकच्या धडकेत १४ भाविक ठार, २९ जण जखमी

October 18, 2026
कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर

कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर

October 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home