Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवा; अकोट फाईल ते हनुमान चौक जुनी पाईपलाईन तात्काळ बदला – निलेश देव

mosami kewat by mosami kewat
June 18, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवा; अकोट फाईल ते हनुमान चौक जुनी पाईपलाईन तात्काळ बदला – निलेश देव

दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवा; अकोट फाईल ते हनुमान चौक जुनी पाईपलाईन तात्काळ बदला – निलेश देव

अकोला : शहरातील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असून, तो उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची थेट जबाबदारी आहे. मात्र अकोट फाईल तीन खांबे (प्रताप मार्बल) ते हनुमान चौक या दरम्यानची सुमारे १,९०० मीटर लांबीची १२ इंच पी.आय. पाईपलाईन अत्यंत जीर्ण, फुटक्या व धोकादायक अवस्थेत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर तडजोड होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे गटनेते निलेश देव यांनी केला आहे.

सन २००२ मध्ये शहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन वारी जलयोजनेअंतर्गत ही पाईपलाईन टाकण्यात आली होती. त्यानंतर शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. सन २०२१ मध्ये अकोट फाईल तीन खांबे परिसरात नवीन पाण्याची टाकी उभारून नायगाव, शिडोळ, भरत नगर, शंकर नगर, लाडीस फाईल, बापू नगर, पंचशील नगर, दम्माणी, न्यू तापडिया नगर, खरप, डुंबे वाडी तसेच प्रभाग क्रमांक १, २ आणि ३ मधील हद्दवाढ भागांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र वाढलेल्या लोकसंख्येचा विचार न करता आजही संपूर्ण भागाचा पाणीपुरवठा जुन्याच १२ इंच क्षमतेच्या पाईपलाईनवर अवलंबून आहे. (Akola Water Supply)

Also Read : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा

याहून गंभीर बाब म्हणजे अकोला–अकोट रस्ता विस्तारीकरणाच्या कामादरम्यान अनेक ठिकाणी नाल्यांचे बांधकाम या पाईपलाईनवरून करण्यात आले. परिणामी जवळपास संपूर्ण १,९०० मीटर पाईपलाईन नाल्यांच्या खाली गेली असून अनेक ठिकाणी ती फुटलेल्या अवस्थेत आहे.

प्रत्यक्ष स्थळ पाहणीदरम्यान फुटलेल्या पाईपलाईनमधून नाल्यातील दूषित पाणी मिसळून ते थेट नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचत असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार केवळ प्रशासनाचा निष्काळजीपणा नसून नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला गंभीर खेळ असल्याची टीका निलेश देव यांनी केली. यामुळे जलजन्य व संसर्गजन्य आजारांचा धोका वाढून सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे सन २०२१ मध्ये नवीन पाण्याची टाकी उभारताना अमृत योजना किंवा इतर निधीतून ही जुनी पाईपलाईन बदलणे अपेक्षित होते. मात्र हा विषय दुर्लक्षित राहिल्याने आज नागरिकांना त्याची मोठी किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे अकोट फाईल तीन खांबे (प्रताप मार्बल) ते हनुमान चौक या दरम्यानची सुमारे १,९०० मीटर लांबीची जुनी १२ इंच पी.आय. पाईपलाईन तात्काळ बदलून तिच्या जागी १६ इंच क्षमतेची नवीन एच.डी.पी.ई. पाईपलाईन टाकण्यास मंजुरी द्यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. (Akola Water Supply)

Also Read : खडकवासला: वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; जे.पी. नगरमधील पथदिवे अखेर सुरू!

प्रशासनाने या विषयाकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी. अन्यथा नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही निलेश देव यांनी दिला.

Tags: AkolaAkola Water SupplyClean WaterMaharashtra newsMunicipal CorporationPublic HealthVanchit Bahujan AghadiWater supply
Previous Post

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा

Next Post

शहीद मुरली नाईक प्रकरणाची अंतिम सुनावणी ७ जुलै रोजी – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
शहीद मुरली नाईक प्रकरणाची अंतिम सुनावणी ७ जुलै रोजी - ॲड. प्रकाश आंबेडकर

शहीद मुरली नाईक प्रकरणाची अंतिम सुनावणी ७ जुलै रोजी - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हल्द्वानीतील शुद्धीकरण प्रकरण : काँग्रेसमध्ये सर्वोच्च स्तरावरही दलित नेत्याला अस्पृश्यासारखी वागणूक; प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल!
बातमी

हल्द्वानीतील शुद्धीकरण प्रकरण : काँग्रेसमध्ये सर्वोच्च स्तरावरही दलित नेत्याला अस्पृश्यासारखी वागणूक; प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल!

by mosami kewat
August 20, 2026
0

मुंबई : आरएसएस-भाजपने हल्द्वानी मध्ये केलेले 'शुद्धीकरण' हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात केलेले जातीयवादी आणि अस्पृश्यतेचे एक घृणास्पद...

Read moreDetails
नांदगाव ग्रामसभेत ‘स्मार्ट वीज मीटर’ला तीव्र विरोध; महावितरण विरोधात सर्वानुमते ठराव मंजूर!

नांदगाव ग्रामसभेत ‘स्मार्ट वीज मीटर’ला तीव्र विरोध; महावितरण विरोधात सर्वानुमते ठराव मंजूर!

August 20, 2026
जालन्यात डॉ. नरेद्र दाभोळकर यांच्या १३ व्या स्मृतीदिना निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

जालन्यात डॉ. नरेद्र दाभोळकर यांच्या १३ व्या स्मृतीदिना निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
पनवेल महानगरपालिकेच्या अनुसूचित जातींसाठीच्या बजेटबाबत वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा

पनवेल महानगरपालिकेच्या अनुसूचित जातींसाठीच्या बजेटबाबत वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा

August 20, 2026
अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी-दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी-दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

August 20, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home