Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शाळा बंद करण्याच्या निर्णयाला वंचित बहुजन युवा आघाडीचा विरोध; आयुक्तांना दिले निवेदन

mosami kewat by mosami kewat
June 11, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
शाळा बंद करण्याच्या निर्णयाला वंचित बहुजन युवा आघाडीचा विरोध; आयुक्तांना दिले निवेदन

शाळा बंद करण्याच्या निर्णयाला वंचित बहुजन युवा आघाडीचा विरोध; आयुक्तांना दिले निवेदन

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 2, 16 आणि 21 या शाळा बंद करण्याचा अथवा त्यांच्या वर्गांचे स्थलांतर करण्याचा कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर तीनही शाळा मागील सुमारे 60 वर्षांपासून कार्यरत असून या शाळांमधून मागासवर्गीय तसेच सर्वसामान्य समाजातील हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. (Solapur Municipal Schools)

या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून उच्च पदे भूषविली आहेत. शाळांच्या इमारती प्रशस्त असून विद्यार्थ्यांसाठी मोठे मैदानही उपलब्ध आहे. या शाळा मागासवर्गीय बहुल भागात स्थित असल्याने परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांचे मोठे महत्त्व आहे. शाळा बंद झाल्यास अथवा वर्गांचे जय भवानी येथील शाळेत स्थलांतर झाल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Also Read : वंचित बहुजन आघाडीच्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश; शिरड शहापूर येथे दर बुधवारी HP गॅस गाडी येणार

त्यामुळे शाळा क्रमांक 2, 16 व 21 या शाळा सुरू ठेवाव्यात आणि त्यांच्या वर्गांचे स्थलांतर करू नये, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीने आयुक्तांकडे केली आहे. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा शहराध्यक्ष महेश जाधव, सचिव नरेंद्र शिंदे, सहसचिव चंद्रकांत सुरवसे, राहुल शिंदे, विनोद जाधव, रवि कांबळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (Solapur Municipal Schools)

Tags: Education For AllMaharashtraPublic EducationRight To EducationSave Municipal SchoolsSave SchoolssolapurSolapur Municipal CorporationSolapur Municipal SchoolsVanchit Bahujan Yuva Aghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडीच्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश; शिरड शहापूर येथे दर बुधवारी HP गॅस गाडी येणार

Next Post

अमेरिकेचा २०० अब्ज डॉलर्सचा एआय जुगार; जागतिक भांडवल बाजारासाठी धोक्याची घंटा?

Next Post
अमेरिकेचा २०० अब्ज डॉलर्सचा एआय जुगार; जागतिक भांडवल बाजारासाठी धोक्याची घंटा?

अमेरिकेचा २०० अब्ज डॉलर्सचा एआय जुगार; जागतिक भांडवल बाजारासाठी धोक्याची घंटा?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कोटा बनावट ऑक्सीटोसिन प्रकरण : सिझेरियननंतर पाच मातांचा मृत्यू; तपासात धक्कादायक सत्य उघड
बातमी

कोटा बनावट ऑक्सीटोसिन प्रकरण : सिझेरियननंतर पाच मातांचा मृत्यू; तपासात धक्कादायक सत्य उघड

by mosami kewat
June 11, 2026
0

कोटा (राजस्थान) : राजस्थानातील कोटा शहरातील न्यू मेडिकल रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीनंतर पाच महिलांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात तपासातून गंभीर धक्कादायक बाब...

Read moreDetails
अमेरिकेचा २०० अब्ज डॉलर्सचा एआय जुगार; जागतिक भांडवल बाजारासाठी धोक्याची घंटा?

अमेरिकेचा २०० अब्ज डॉलर्सचा एआय जुगार; जागतिक भांडवल बाजारासाठी धोक्याची घंटा?

June 11, 2026
शाळा बंद करण्याच्या निर्णयाला वंचित बहुजन युवा आघाडीचा विरोध; आयुक्तांना दिले निवेदन

शाळा बंद करण्याच्या निर्णयाला वंचित बहुजन युवा आघाडीचा विरोध; आयुक्तांना दिले निवेदन

June 11, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश; शिरड शहापूर येथे दर बुधवारी HP गॅस गाडी येणार

वंचित बहुजन आघाडीच्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश; शिरड शहापूर येथे दर बुधवारी HP गॅस गाडी येणार

June 10, 2026
उमरखेडच्या विश्वजीत धुळेची भारतीय सैन्यात निवड; वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान!

उमरखेडच्या विश्वजीत धुळेची भारतीय सैन्यात निवड; वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान!

June 10, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home