Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home अर्थ विषयक

अमेरिकेचा २०० अब्ज डॉलर्सचा एआय जुगार; जागतिक भांडवल बाजारासाठी धोक्याची घंटा?

mosami kewat by mosami kewat
June 11, 2026
in अर्थ विषयक, विज्ञान - तंत्रज्ञान, सामाजिक
0
अमेरिकेचा २०० अब्ज डॉलर्सचा एआय जुगार; जागतिक भांडवल बाजारासाठी धोक्याची घंटा?

अमेरिकेचा २०० अब्ज डॉलर्सचा एआय जुगार; जागतिक भांडवल बाजारासाठी धोक्याची घंटा?

       

– संजीव चांदोरकर

पुढच्या काही आठवड्यात अमेरिकेतील वॉल स्ट्रीट नामक शेती, “आयपीओ” नामक महाकाय पंपातून, कोट्यवधी लिटर्स भांडवल नामक पाणी खेचणार आहे !

नजीकच्या काळात त्याचे परिणाम भारतासकट इतर जगातील भांडवल बाजारांवर म्हणून अर्थव्यवस्थांवर होऊ शकतात

उदा. जगातून मोठ्या प्रमाणावर भांडवल अमेरिकन भांडवल बाजारात खेचले जाऊ शकते. त्यामुळे इतर देशात भांडवलाचा तुटवडा पडू शकतो.

उदा. एक श्रीमंत शेतकरी महाकाय अश्वशक्तीच्या पम्प लावून त्याच्या शेतातील विहिरीतून लाखो लिटर्स पाणी उपसतो. त्यामुळे आजूबाजूच्या शेतातील विहिरींचे पाणी आटते. तसेच काहीसे.

गेली अनेक वर्षे एलोन मस्क नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आधी टेस्ला या विजेवर चालणाऱ्या कार मुळे, नंतर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची टीम जॉईन केल्यामुळे आणि आता जगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ लॉन्च करत असल्यामुळे

एलोन मस्क यांनी त्यांच्या वेगवेगळ्या असणाऱ्या कंपन्या / तीन ॲक्टिव्हिटीज त्यांनी एका कंपनीच्या छत्राखाली आणल्या आहेत. उपग्रह सेवा , स्टारलिंक ही दूरसंचार सेवा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. या महाकाय कंपनीचे नाव आहे स्पेस एक्स (SPACE X )

स्पेस एक्स कंपनीचा आयपीओ पुढच्या काही दिवसात येऊ घातला आहे.

कंपनी प्रत्येकी १३५ डॉलर्स किंमत ठेवून ५५ कोटी शेअर्स विक्रीला काढणार आहे. या आयपिओ मधून ७५ बिलियन डॉलर्स गोळा होतील असा अंदाज आहे. ( रुपयातील आकडा सांगणे अप्रस्तुत आहे. पण एक अंदाज येण्यासाठी. एक डॉलर ९५ रुपये धरला तर हा आयपीओ मध्ये ७ लाख कोटी रुपयांचा असेल). या शेयरच्या किमतीला कंपनीचे बाजारमूल्य १८०० बिलियन डॉलर्स (१.८ ट्रिलियन डॉलर्स) होऊ शकते.

स्पेस एक्स कंपनी एवढे बाजारमूल्य टिकवण्यासाठी पर्याप्त वार्षिक विक्री आणि नफा खरेच कमावू शकेल का? याबद्दल तज्ञांना शंका आहेत.

उदा एनव्हीडीया या सर्वात अग्रगण्य टेक कंपनीच्या बाजारमूल्य आणि वार्षिक विक्री यांचे गुणोत्तर २० आहे. तर स्पेस एक्सचे अंदाजित बाजारमूल्य खरे मानले तर त्याचे स्पेस एक्सच्या सध्याच्या विक्रीशी गुणोत्तर ९० पडते !

हा जगातील आतापर्यंत चा सर्वात मोठा अयापियो असेल. एक ऐतिहासिक उच्चांक; जगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ २०१९ मध्ये सौदी अरेबियाच्या Aramco २९ बिलियन डॉलर्स होता

स्पेस एक्स च्या ७५ बिलियन डॉलर्सच्या / ७,००,००० कोटी रुपयांच्या आयपीओच्या तुलनेत भारतातील सर्वात मोठे आयपीओचे आकडे किती पिग्मी वाटतात ते बघा: ह्युंदाई मोटार २८,००० कोटी (२०२४) ; एल आय सी २१,००० कोटी (२०२२); पेटीएम १८,००० कोटी (२०२१)

बातमी फक्त स्पेस एक्सच्या आयपीओची नाहीये. तर अमेरिकन भांडवल बाजार आणि त्याच्या साहाय्याने अमेरिकन आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्र सर्व जगावर नजीकच्या काळात पकड घेऊ शकते ही आहे.

उदा. अमेरिकन ओपन एआय आणि एन्थ्रोपिक या दोन आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपन्या देखील आपापले मोठे आयपीओ काढत आहेत. इतर एआय कंपन्या देखील अंदाज घेऊन उतरणार आहेत हे नक्की. या दोन कंपन्या, स्पेस एक्स वगैरे धरून डिसेम्बर पर्यंत जवळपास २०० बिलियन डॉलर्स उभे केले जाणार आहेत. मेटा, गुगल, अल्फाबेट या हायपर स्केलर्स एआय कंपन्या वर्षभरात ६०० बिलियन डॉलर्सची भांडवली गुंतवणूक करणार आहेत.

अमेरिकेतील भांडवलं बाजारातील घडामोडी अगदी आपल्या देशपर्यंत येऊन भिडतात. भारतातील गुंतवणुकी एफ आय आय काढून घेणार की नाही हे ठरते. त्यावरून डॉलर रुपया विनिमय दर प्रभावित होतो. त्यावरून आपण पेट्रोल डिझेलला किती पैसे द्यायचे हे ठरते.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपन्याच्या बाजारभावात बबल तयार होत आहे का असा प्रश्न गेली अनेक महिने चर्चिला जात आहे. शेयरच्या किमती एवढ्या आक्रमक ठेवल्या गेल्या तर भविष्यात त्या कोसळण्याची शक्यता जास्त असते.

अमेरिकेतील भांडवल बाजारातील अरिष्ट अमेरिकेतपुरते मर्यादित कधीच राहू शकत नाही. ते जागतिक अरिष्ट बनत असते.


       
Tags: AIamericaArtificial IntelligenceEconomicGlobal Economic ImpactGlobal Liquidity DrainIPO Market TrendsSpaceX IPO
Previous Post

शाळा बंद करण्याच्या निर्णयाला वंचित बहुजन युवा आघाडीचा विरोध; आयुक्तांना दिले निवेदन

Next Post

कोटा बनावट ऑक्सीटोसिन प्रकरण : सिझेरियननंतर पाच मातांचा मृत्यू; तपासात धक्कादायक सत्य उघड

Next Post
कोटा बनावट ऑक्सीटोसिन प्रकरण : सिझेरियननंतर पाच मातांचा मृत्यू; तपासात धक्कादायक सत्य उघड

कोटा बनावट ऑक्सीटोसिन प्रकरण : सिझेरियननंतर पाच मातांचा मृत्यू; तपासात धक्कादायक सत्य उघड

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home