Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

घरगणना नसेल तर विकासाचे बजेट कसे ठरणार? – ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव

mosami kewat by mosami kewat
June 3, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
घरगणना नसेल तर विकासाचे बजेट कसे ठरणार? - ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव

घरगणना नसेल तर विकासाचे बजेट कसे ठरणार? - ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव

       

भटके-विमुक्तांच्या घरगणना व जनगणनेसाठी मुशाफिरी यात्रा : ११० गावांचा दौरा

जामखेड : भटके-विमुक्त समाजाच्या घरगणना व जनगणनेच्या प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात व्यापक मुशाफिरी यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भटके-विमुक्त नेते तथा जामखेड नगरसेवक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी दिली. यासंदर्भात २ जून २०२६ रोजी जामखेड येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी ग्रामीण विकास सचिवा उमा जाधव, संचालक बापूसाहेब ओव्होळ, संतोष चव्हाण, रेश्मा बागवान, ललिता पवार, भक्ती पवार, कीर्ती पवार, भाविका टिकार, श्रुती थोरात, साहिल जाधव आदी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी सांगितले की, भटके-विमुक्त समाजाच्या पाल, कुड व कोपी स्वरूपातील निवाऱ्यांची शासकीय घरगणनेत योग्य नोंद होत नसल्याने या समाजाचे वास्तव चित्र शासनापुढे येत नाही. सध्याच्या ऑनलाइन घरगणना प्रक्रियेत पाल, कुड किंवा कोपी यांसाठी स्वतंत्र पर्याय नसल्याने भटके-विमुक्त नागरिक वंचित राहत असल्याचा त्यांनी सांगितले. (Nomadic Tribes Census)

Also Read : धर्माबादमध्ये भीम आर्मीच्या असंख्य कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

भटके-विमुक्त हे या देशाचे नागरिक नाहीत का? त्यांची घरगणना आणि जनगणना झाली नाही तर त्यांच्या लोकसंख्येचा अचूक आकडा कसा समोर येणार? लोकसंख्येची माहिती उपलब्ध नसल्यास त्यांच्या विकासासाठीचे बजेट, कल्याणकारी योजना आणि निधी नियोजन कसे होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

भटके-विमुक्त समाज उपजीविकेसाठी सतत भटकंती करत असल्याने त्यांच्या जनगणनेतही अडचणी निर्माण होतात. त्यामुळे या समाजाच्या घरगणना व जनगणनेसाठी शासनाने स्वतंत्र आणि संविधानसुसंगत यंत्रणा उभारावी, अशी मागणी त्यांनी केली. संविधानाने दिलेले अन्न, वस्त्र आणि निवारा हे मूलभूत अधिकार भटके-विमुक्त समाजालाही समानपणे मिळाले पाहिजेत. या मागण्यांसाठी आणि न्याय हक्कांसाठी संवाद पालावर, वस्तीवर, वाडीवर या संकल्पनेतून मुशाफिरी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. (Nomadic Tribes Census)

Also Read : परतूरमध्ये आचारसंहितेचा फज्जा! पाणी योजनेच्या उद्घाटनावरून वाद; वंचित बहुजन आघाडीची गुन्हा दाखल करण्याची मागणी

ही मुशाफिरी यात्रा दि. ५ जून ते १५ जून २०२६ रोजी होणार आहे. तसेच अहमदनगर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना आणि औरंगाबाद या आठ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार असून, या दौऱ्यात सुमारे ११० गावांना भेटी देण्यात येणार आहेत. यात्रेद्वारे भटके-विमुक्त समाजाच्या वस्त्या, पाल आणि वाड्यांवर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. तसेच घरगणना व जनगणनेबाबत जनजागृती करून शासनापर्यंत समाजाच्या मागण्या पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


       
Tags: Arun Aba JadhavDenotified Tribes CensusDr Arun JadhavJamkhed NewsMaharashtraMaharashtra Household SurveyMushafiri YatraNomadic CommunitiesNomadic Tribes Census
Previous Post

यवतमाळातील लाडक्या बहिणींच्या खात्यात निधी जमा; ॲड. डी. के. दामोधर यांच्या पाठपुराव्याला यश

Next Post

बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकांना आव्हान द्या; नव्या याचिका दाखल करा : ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकांना आव्हान द्या; नव्या याचिका दाखल करा : ॲड. प्रकाश आंबेडकर

बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकांना आव्हान द्या; नव्या याचिका दाखल करा : ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आंबेडकरी कार्यकर्ता आपली मते प्रभावीपणे मांडू शकतो ; सुजात आंबेडकरांचा आरक्षण आणि मेरिटवर बोट ठेवणाऱ्यांवर निशाणा 
बातमी

आंबेडकरी कार्यकर्ता आपली मते प्रभावीपणे मांडू शकतो ; सुजात आंबेडकरांचा आरक्षण आणि मेरिटवर बोट ठेवणाऱ्यांवर निशाणा 

by mosami kewat
August 3, 2026
0

मुंबई : अमित ठाकरेपेक्षा आमच्या आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ता प्रभावीपणे आपली मते मांडू शकतो आणि मांडत आहे. फरक फक्त एवढाच आहे...

Read moreDetails
चीनच्या घुसखोरीवर आक्रमकपणा का नाही? अल्पवयीन मुलींवरील कारवाईवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल

चीनच्या घुसखोरीवर आक्रमकपणा का नाही? अल्पवयीन मुलींवरील कारवाईवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल

August 3, 2026
आरोग्य सेवा की नफ्याची बाजारपेठ? हॉस्पिटल्सच्या वित्तीयीकरणाचा सामाजिक प्रभाव

आरोग्य सेवा की नफ्याची बाजारपेठ? हॉस्पिटल्सच्या वित्तीयीकरणाचा सामाजिक प्रभाव

August 3, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीची मतमोजणी अजूनही सुरूच !

वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीची मतमोजणी अजूनही सुरूच !

August 3, 2026
अमित शहा गो बॅक! वंचित बहुजन आघाडीचे पुण्यात काळे झेंडे दाखवून आंदोलन

अमित शहा गो बॅक! वंचित बहुजन आघाडीचे पुण्यात काळे झेंडे दाखवून आंदोलन

August 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home