Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

यवतमाळातील लाडक्या बहिणींच्या खात्यात निधी जमा; ॲड. डी. के. दामोधर यांच्या पाठपुराव्याला यश

mosami kewat by mosami kewat
June 3, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
यवतमाळातील लाडक्या बहिणींच्या खात्यात निधी जमा; ॲड. डी. के. दामोधर यांच्या पाठपुराव्याला यश

यवतमाळातील लाडक्या बहिणींच्या खात्यात निधी जमा; ॲड. डी. के. दामोधर यांच्या पाठपुराव्याला यश

       

आर्णी (यवतमाळ) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनेक महिलांच्या खात्यात निधी जमा होणे बंद झाल्याच्या तक्रारीनंतर वंचित बहुजन आघाडीने केलेल्या पाठपुराव्यामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यात पुन्हा पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या गाजावाजात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. सुरुवातीला काही महिन्यांपर्यंत महिलांच्या खात्यात नियमित निधी जमा होत होता. मात्र, केवायसीसह विविध कारणे पुढे करत अनेक महिलांचे अनुदान थांबविण्यात आल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या.

Also Read : धर्माबादमध्ये भीम आर्मीच्या असंख्य कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

या संदर्भातील तक्रारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्ष ॲड. डी. के. दामोधर यांना गावपातळीवर जाऊन महिलांच्या समस्या जाणून घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ॲड. दामोधर यांनी आर्णी तालुक्यातील उमरी, दाभडी, पहूर नस्करी आणि लोणी या गावांचा दौरा करून लाभार्थी महिलांशी संवाद साधला. या दौऱ्यात आर्णी तालुका अध्यक्ष उत्तम मुनेश्वर, जिल्हा सदस्य अजाब मेसेकार, तालुका महासचिव भारत गायकवाड तसेच रवी उंबरे, वाकोडे, खान, धनराज रामटेके, जगताप आणि स्थानिक पदाधिकारी सहभागी झाले होते. महिलांशी झालेल्या चर्चेत अनेक दिवसांपासून त्यांच्या खात्यात योजनेचा निधी जमा होत नसल्याचे निदर्शनास आले. (Ladki Bahin Yojana Scheme)

यानंतर ॲड. दामोधर यांनी 18 मे रोजी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांना तातडीने निधी वितरित करण्याची मागणी केली. त्यानंतर 19 मे 2026 पासून जिल्ह्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यात पुन्हा निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Also Read : मान्सून तोंडावर; चितलवाडीतील सांडपाणी नाल्यांची तातडीने स्वच्छता करण्याची वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी

याबाबत बोलताना ॲड. डी. के. दामोधर म्हणाले, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपात जिल्ह्यातील मागासवर्गीय महिलांवर अन्याय होत असल्याचे आढळल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.” दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या या पाठपुराव्यामुळे गरजू महिलांना योजनेचा लाभ पुन्हा मिळू लागल्याने पक्षाच्या कार्याचे विविध स्तरांतून कौतुक केले जात आहे.


       
Tags: Balasaheb AmbedkarLadki Bahin Yojana SchemeMaharashtraMukhyamantri Majhi Ladki Bahin YojanaWomenYavatmal News
Previous Post

धर्माबादमध्ये भीम आर्मीच्या असंख्य कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

Next Post

घरगणना नसेल तर विकासाचे बजेट कसे ठरणार? – ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव

Next Post
घरगणना नसेल तर विकासाचे बजेट कसे ठरणार? - ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव

घरगणना नसेल तर विकासाचे बजेट कसे ठरणार? - ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नवीन स्वस्त धान्य दुकाने सुरू करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी
बातमी

ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नवीन स्वस्त धान्य दुकाने सुरू करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

by mosami kewat
July 14, 2026
0

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गाव-खेड्यांमध्ये वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन नवीन स्वस्त धान्य दुकानांसाठी तातडीने जाहीर प्रकटन काढावे, तसेच...

Read moreDetails
शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करा; वंचित बहुजन आघाडीचे मंगळवेढा प्रशासनाला निवेदन

शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करा; वंचित बहुजन आघाडीचे मंगळवेढा प्रशासनाला निवेदन

July 14, 2026
सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत वाढली चिंता; वंचित बहुजन आघाडीकडून उपोषण मागे घेण्याचे आवाहन!

सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत वाढली चिंता; वंचित बहुजन आघाडीकडून उपोषण मागे घेण्याचे आवाहन!

July 14, 2026
भूममधील कथित सिंथेटिक दूध रॅकेटचा पर्दाफाश; लाखो लिटर भेसळयुक्त दुधाचा संशय, राज्यभर खळबळ

भूममधील कथित सिंथेटिक दूध रॅकेटचा पर्दाफाश; लाखो लिटर भेसळयुक्त दुधाचा संशय, राज्यभर खळबळ

July 14, 2026
TET पेपर फुटी प्रकरण – सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश; शिक्षणमंत्री यांनी मान्य केल्या मागण्या!

TET पेपर फुटी प्रकरण – सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश; शिक्षणमंत्री यांनी मान्य केल्या मागण्या!

July 13, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home