Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

धर्माबादमध्ये भीम आर्मीच्या असंख्य कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

mosami kewat by mosami kewat
June 3, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
धर्माबादमध्ये भीम आर्मीच्या असंख्य कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
       
धर्माबाद (नांदेड) : धर्माबाद तालुक्यातील भीम आर्मीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश करत पक्षाला मोठे बळ दिले आहे. आर्य भवन, धर्माबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित जनसंवाद व पक्षप्रवेश सोहळ्यात हा प्रवेश पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांनी भूषविले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेश सदस्य आकाश बनसोड, जिल्हा उपाध्यक्ष अरुण भद्रे, युवा जिल्हा संघटक संदेश गायकवाड, जिल्हा सदस्य प्रकाश कोल्हे, जे. के. जोंधळे सलागर, माजी तालुकाध्यक्ष एकनाथ जिंकले, माजी तालुका महासचिव गौतम देवके, तालुका संघटक चांदोबा वागमारे, युवा तालुकाध्यक्ष कपिल वागमारे, शहराध्यक्ष रोहित रमटक्के, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष कैलास डुमने तसेच शुभाष कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

या सोहळ्यात मौजे माष्टी येथील बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. दीपक मारोतराव कांबळे, संदीप दिगंबर सूर्यवंशी, अविनाश गोविंद कांबळे, रवि मनोहर कांबळे, उजलाजी धर्माजी सोनकांबळे, विकास उजलाजी कांबळे, सुनिल पिराजी सोनकांबळे, पंडित गोविंद कांबळे, बालाजी पिराजी सोनकांबळे, गणेश चंदू सोनकांबळे, माधव पुंडलिक सोनकांबळे, व्यंकट मारोती सोनकांबळे, सोनबा निवृत्ती सोनकांबळे, पांडुरंग शंकर सोनकांबळे, देविदास शंकर सोनकांबळे, अतुल विठ्ठल कांबळे, विलास दिगंबर कांबळे आणि दिलीप दिगंबर कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.

भीम आर्मीचे माजी तालुकाध्यक्ष मिलिंद प्रकाश सोनकांबळे यांच्या पुढाकारातून नितीन भालके, संदीप वागमारे, संजय निदांकर, भैया वागमारे, रविकिशन वागमारे, संदीप सूर्यवंशी मस्टीकार, भारत जोंधळे पांगरी, किरण हणमंते, प्रमोद विकास लांडगे, शामराव लोखंडे, भारतरत्न जोंधळे, सुरेश हणमंते, दिगंबर झपटे, दयानंद लाव्हाले, दिलीप मोटेवर, लक्ष्मण जिंकले, अंकुश वागमारे, दिलीप कांबळे, प्रवेश वागमारे, साहेबराव कांबळे, राजू सोनकांबळे, भगत राहेर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पक्षाची विचारधारा, सामाजिक न्याय आणि बहुजनांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या चळवळीबाबत मार्गदर्शन केले. 

Tags: MaharashtranandedVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

पंचशील ध्वज विटंबना प्रकरणी वंचित बहुजन आघाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार!

Next Post

यवतमाळातील लाडक्या बहिणींच्या खात्यात निधी जमा; ॲड. डी. के. दामोधर यांच्या पाठपुराव्याला यश

Next Post
यवतमाळातील लाडक्या बहिणींच्या खात्यात निधी जमा; ॲड. डी. के. दामोधर यांच्या पाठपुराव्याला यश

यवतमाळातील लाडक्या बहिणींच्या खात्यात निधी जमा; ॲड. डी. के. दामोधर यांच्या पाठपुराव्याला यश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नांदेड विधान परिषद निवडणुकीतील मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; प्रशांत इंगोले यांची निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी
बातमी

नांदेड विधान परिषद निवडणुकीतील मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; प्रशांत इंगोले यांची निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी

by mosami kewat
June 23, 2026
0

नांदेड : नांदेड जिल्हा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणूक २०२६ मधील मतदान प्रक्रियेबाबत गंभीर शंका उपस्थित करत उमेदवार इंजि....

Read moreDetails
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाचा विकास करावा – निलेश देव

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाचा विकास करावा – निलेश देव

June 23, 2026
माजी सरपंच धर्मेंद्र जाधव यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

माजी सरपंच धर्मेंद्र जाधव यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

June 23, 2026
पंचशील ध्वजाच्या पुनर्स्थापनेसाठी लोह्यात भव्य जनआक्रोश मोर्चा; आंदोलकांचा प्रशासनाला इशारा

पंचशील ध्वजाच्या पुनर्स्थापनेसाठी लोह्यात भव्य जनआक्रोश मोर्चा; आंदोलकांचा प्रशासनाला इशारा

June 23, 2026
अल निनो ते एआय: भारतीय शेतीची ताकद आणि आव्हाने

अल निनो ते एआय: भारतीय शेतीची ताकद आणि आव्हाने

June 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home