Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

NEET-UG परीक्षा घोटाळ्याविरोधात अहमदनगरमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन

mosami kewat by mosami kewat
May 29, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
NEET-UG परीक्षा घोटाळ्याविरोधात अहमदनगरमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन
       
Vanchit Bahujan Aghadi Protest : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात टाकणाऱ्या NEET-UG २०२६ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाविरोधात वंचित बहुजन आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या अहमदनगरमध्ये वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय मार्गाने धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलन संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी उपचिटनीस तथा नायब तहसीलदार मयुर बेरड (गृह शाखा) यांना आपल्या मागण्यांचे अधिकृत निवेदन सुपूर्द केले.

हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. या प्रसंगी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अजित कुऱ्हाडे, उप महासचिव पंकज गायकवाड, तसेच अविनाश ठोंबरे, प्रसाद कांबळे, आणि संकेत शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात पुढील मागणी करण्यात आली आहे : 

– NEET-UG २०२६ पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा.

– परीक्षा घेण्याची जबाबदारी National Testing Agency (NTA) कडून काढून घेऊन ती UPSC कडे सोपवण्यात यावी.

– विद्यार्थ्यांसाठी NEET ची फेरपरीक्षा पूर्णपणे विनामूल्य आणि तत्काळ घेण्यात यावी.

– व्यावसायिक कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने स्वतंत्र व कडक कायदा लागू करावा.

शिक्षणाचा हा वाढता बाजार आणि भ्रष्टाचार थांबवला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या वेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने देण्यात आला.

Tags: ahmadnagarAhmedabadMaharashtraNEETneet 2026PoliticalVanchit Bahujan Aghadi Protest
Previous Post

हमीरपुरमध्ये भीषण दुर्घटना : बेतवा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला, ६ मजुरांचा मृत्यू

Next Post

लोहा येथे ३२ वर्षांपासून फडकत असलेला पंचशील ध्वज हटवला; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र आंदोलनाचा इशारा 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मुंबई में 1 अक्टूबर को ‘हम ईरान के साथ’ मार्च; एड. प्रकाश आंबेडकर ने की मुस्लिम समुदाय से शामिल होने की अपील!
बातमी

मुंबई में 1 अक्टूबर को ‘हम ईरान के साथ’ मार्च; एड. प्रकाश आंबेडकर ने की मुस्लिम समुदाय से शामिल होने की अपील!

by mosami kewat
September 21, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष एड. प्रकाश आंबेडकर ने 1 अक्टूबर को मुंबई में आयोजित किए जाने...

Read moreDetails
भारिपचे माजी सभापती अ. हमीद यांचे निधन; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली कुटुंबांयांची घेतली सांत्वनपर भेट!

भारिपचे माजी सभापती अ. हमीद यांचे निधन; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली कुटुंबांयांची घेतली सांत्वनपर भेट!

September 21, 2026
शैक्षणिक संस्था की संस्थात्मक कत्तलखाने ?

शैक्षणिक संस्था की संस्थात्मक कत्तलखाने ?

September 21, 2026
‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर

‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर

September 21, 2026
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

September 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home