Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

mosami kewat by mosami kewat
November 5, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा
       

मुंबई – राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी-कष्टकरी बांधवांकडे सरकारने दाखवलेल्या असंवेदनशीलतेचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रात ‘काळी दिवाळी’ साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी बांधवांसोबत चटणी-भाकर खाऊन अनोख्या पद्धतीने हा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे आणि महासचिव प्रा. सोमनाथ साळुंके यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, पावसाच्या अनियमिततेमुळे आणि सरकारच्या नियोजनाअभावी राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके करपून गेली असून पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक, कामगार, अलुतेदार-बलुतेदार, मिस्त्री, कंत्राटी कामगार आणि ग्रामीण भागातील सामान्य कष्टकरी यांना अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अशा महाभयंकर संकटाच्या काळात दुष्काळ जाहीर करून मदत देण्याऐवजी, कर्जमाफी देण्याऐवजी आणि आवश्यक उपाययोजना राबविण्याऐवजी राज्य सरकार महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून केवळ राजकीय सोहळे आणि उत्सवांमध्ये मग्न आहे.

सरकारच्या या शेतकरी-विरोधी आणि निष्काळजी धोरणामुळे ग्रामीण शहरी भागातील नागरिक हवालदिल झाले असून सरकारने उपाययोजना न केल्याने राज्यातील नागरिक दिवाळी साजरी करू शकत नाही, त्यामुळे सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्य अभूतपूर्व संकटात सापडले आहे.

या जनविरोधी कारभाराचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि दुष्काळग्रस्त बळीराजा व कष्टकऱ्यांच्या वेदनांशी एकरूप होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने ‘काळी दिवाळी’ साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि कष्टकरी एकत्र येतील. निषेधाची नोंद घेत केवळ पाच शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात येईल.

पार्टीने सर्व जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, महासचिव, महानगर, शहर, तालुका, सर्कल, ग्राम व वॉर्ड शाखा पदाधिकारी तसेच महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, विद्वत सभा, कामगार आघाडी आणि इतर सर्व आघाड्यांना आवाहन केले आहे की, परिसरातील शेतकरी-कष्टकऱ्यांसह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि आंदोलनासाठी युद्धपातळीवर नियोजन करावे. वंचित बहुजन आघाडीच्या या आंदोलनामुळे राज्यातील दुष्काळ आणि शेतकरी प्रश्नांबाबत पुन्हा एकदा येणार आहे.


       
Tags: AgricultureBlack DiwaliFarmerMaharashtraprotestRajendra PatodeVanchit Bahujan Aghadi
Previous Post

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा
बातमी

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

by mosami kewat
November 5, 2026
0

मुंबई - राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी-कष्टकरी बांधवांकडे सरकारने दाखवलेल्या असंवेदनशीलतेचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रात ‘काळी...

Read moreDetails
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

November 5, 2026
अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

November 5, 2026
सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले - ॲड. प्रकाश आंबेडकर

सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले – ॲड. प्रकाश आंबेडकर

November 4, 2026
जीडीपीच्या आकड्यांपलीकडे : सामान्य माणसाच्या आर्थिक स्थितीचे काय?

जीडीपीच्या आकड्यांपलीकडे : सामान्य माणसाच्या आर्थिक स्थितीचे काय?

November 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home