Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home article

म्युन्सिपल फायनान्सचे ‘वित्तीयकरण’: नागरी विकासाचा नवा जुगार?

mosami kewat by mosami kewat
May 28, 2026
in article, अर्थ विषयक, राजकीय, सामाजिक
0
म्युन्सिपल फायनान्सचे ‘वित्तीयकरण’: नागरी विकासाचा नवा जुगार?

म्युन्सिपल फायनान्सचे ‘वित्तीयकरण’: नागरी विकासाचा नवा जुगार?

       

मोदी राजवटीला १२ वर्षे झाली. साहजिकच त्याचा लेखाजोखा मांडला जात आहे. पण या १२ वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रांच्या वित्तियीकरणाची जी प्रक्रिया सुरु आहे त्याची नोंद घेतली गेली पाहिजे. या संरचनात्मक बदलाचे परिणाम खोल आणि दीर्घकालीन असणार आहेत; त्यातीलच हे एक “म्युन्सिपल फायनान्स”चे वित्तीयकरण (फायनान्शिअलायझेशन) !

मुंबई महानगरपालिकेने २०२६-२७ या वर्षात १००० कोटी रुपयांचे हरित रोखे / ग्रीन बॉण्ड्स उभारण्यासाठी मर्चंट बँकर नेमण्यासाठी निविदा काढल्या आहेत (लोकसत्ता मे २७, २०२६, पान क्रमांक ३)

मुंबई महानगरपालिकेकडे मोठ्या प्रमाणावर बँक डिपॉझिट होती/ आहेत. या डिपॉझिटवर मिळणारे व्याज एक मोठा स्त्रोत होता / आहे. येत्या काळात ती डिपॉझिट्स मोडली जात शकतात. म्हणजे त्यावर मिळणारे व्याज महानगरपालिकेला मिळणार नाही.

मिळणारे व्याज कमी कमी होत जाणार आणि त्याचवेळी उभारलेल्या रोख्यांवर व्याज देण्यासाठी तरतुदी कराव्या लागतील. दुसऱ्या शब्दात भविष्यात व्याज चक्र उलटे फिरणार आहे.

मुंबई महानगरपालिका एकटी नाही. आतापर्यंत हैदराबाद, अहमदाबाद, इंदोर, चेन्नई, नाशिक, सुरत, पिंपरी चिंचवड, भोपाळ, पुणे अशा १२ नगरपालिकांनी ४,३०० कोटी रुपयांचे रोखे काढले आहेत. नजिकच्या काळात पाटणा, बंगलोर, नागपूर, औरंगाबाद म्युन्सिपॉलिटीज काढणार आहेत.

केंद्र सरकार यासाठी प्रोत्साहन योजना राबवत आहे. १००० कोटी रुपयांचे ग्रीन बाँड काढणाऱ्या म्युनिसिपालटिजना १०० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाईल. दुसऱ्या शब्दात मन्युन्सिपल रोखे हा त्या म्युन्सिपालिटीचा निर्णय नाही तर हा राजकीय निर्णय आहे.

स्वातंत्र्याच्या आधीपासून ( पिण्याचे पाणी, नागरी वाहतूक, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी ) नागरी पायाभूत सुविधा / अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर या त्या शहराच्या नगरपालिका/ महानगरपालिकेने द्यावयाच्या हे गृहीत धरलेले होते.

त्यासाठी आधी स्थानिक स्वराज्य संस्थांना / अर्बन लोकल बॉडीज निरनिराळे कर आकारण्याचा अधिकार देण्यात आला होता. जीएसटी सुधारणांमुळे प्रॉपर्टी टॅक्स सोडला तर फारसे कर निर्धारण अधिकार त्यांना राहिलेले नाहीत.

फायनान्स कमिशनच्या फॉर्म्युल्यानुसार केंद्र सरकार आणि अधिक राज्य सरकारे स्थानिक स्वराज्य संस्थांना फंडस् देतात. त्यातून त्यांचे अर्थसंकल्प बनतात. वाढत्या नागरीकरणामुळे ते स्रोत कमी पडतात.

स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्याला लागणारे अतिरिक्त स्रोत भांडवल बाजारातून उभे करावेत यासाठी सारी धोरणात्मक नेपथ्य रचना उभी केली जात आहे.

अमेरिका आणि विकसित देशांत म्युन्सिपॉलिटीज रोखे उभारणी करतात. त्याला “मुनी बाँड” असे म्हणतात. अमेरिकेतील मुनी बाँडची बाजारपेठ काही ट्रिलियन्स डॉलर्सची आहे.

याचे डायरेक्ट प्रतिबिंब रोखे काढणाऱ्या म्युन्सिपॉलिटीजच्या अर्थसंकल्पात पडणार आहे. या रोख्यांवरील व्याजासाठी ज्या प्रमाणात तरतूद करावी लागेल त्याप्रमाणात नागरिकांच्या सुविधा/ कल्याणकारी योजनांसाठी पैसे कमी उपलब्ध होतील.

हे रोखे दीर्घकालीन असतात. पण त्यांची दहा वर्षांनी वगैरे परतफेड करावी लागते. त्यावेळी खरेतर त्यांचे नूतनीकरण होते. दुसऱ्या शब्दात रोखे आता कायमचे म्युनिसिपालटिजच्या घरात कायमचे राहायला येणार आहेत. त्याचा cumulative आकडा नेहमी वाढत जाणार आहे.

हे एका स्त्रोताच्या जागी दुसरा स्रोत एवढे सोपे नाहीये. गंभीर प्रकरण आहे ते. एकदा कर्जबाजातून अधिकाधिक रोखे उभारणीतून अर्थसंकल्प बनू लागले तर अर्थसंकल्पीय तरतुदींमधील मोठा हिस्सा व्याजावर खर्च होतो. उदा. केंद्र सरकारच्या अर्थानकल्पातील २५ टक्के, एक चतुर्थांश हिस्सा फक्त व्याजावर खर्च होतो. किती १२ लाख कोटी रुपये ! दरवर्षी !

हे रोखे भविष्यात स्टॉक मार्केटवर लिस्टेड असतील. त्यांचे भाव वरखाली होतील. म्युनिस्पॉलटिजना कल्याणकारी योजनांवरील खर्च वाढवता येणार नाहीत. व्याज, परतफेड यावर डिफॉल्ट करता येणार नाही. वित्त भांडवलाच्या खेळाच्या नियमाप्रमाणे न खेळणाऱ्या म्युन्सिपलाटिजना त्याची किंमत मोजावी लागेल.

भारताच्या राजकीय अर्थव्यवस्थेचे होणारे वित्तीयीकरण (भांडवल बाजारातील बचती, विविध प्रकारची कर्जे, विविध प्रकारचे विमा, पेन्शन यादी मोठी आहे) बॉटम ऑफ पिरॅमिड मधील सर्वच जात, धर्म, प्रांत, भाषा, स्त्री पुरुष…. यांना एकचप्रकारे बाधित करत आहेत. करणार आहेत. वित्त भांडवल ग्राहकांमध्ये बिगर आर्थिक निकषांवर कोणताही फरक करत नाही.

यात खरेतर संकुचित अस्मितावादी राजकारणाला काउंटर करू शकणाऱ्या सामाजिक/ राजकीय कार्यक्रमाची बीजे आहेत.


       
Tags: bmcinancialization of EconomyIndia Green BondsInfrastructure Funding Indian EconomyMumbai Municipal CorporationMunicipal BondsMunicipal FinanceMunicipal Finance CrisisUrban Analysis Financialization
Previous Post

दीक्षाभूमीवर हिंदुत्ववादी भगवाध्वज; युवक काँग्रेसकडून छेडछाड, भाजपसारख काँग्रेसही बौद्धांचा द्वेष करते ?

Next Post

“कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से…” उर्दू गझलविश्वातील तेजस्वी आवाज हरपला; शायर बशीर बद्र यांचे निधन

Next Post
"कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से…" उर्दू गझलविश्वातील तेजस्वी आवाज हरपला; शायर बशीर बद्र यांचे निधन

"कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से…" उर्दू गझलविश्वातील तेजस्वी आवाज हरपला; शायर बशीर बद्र यांचे निधन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती
बातमी

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती

by mosami kewat
July 28, 2026
0

औरंगाबाद : शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील सुनावणी आज न्यायालयात पार पडली. या प्रकरणात पुढील सुनावणीदरम्यान न्यायालय स्वतः नियमावली (गाईडलाईन्स) तयार...

Read moreDetails
पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताचा ऐतिहासिक डंका: शर्मिला धनखडची सुवर्ण कामगिरी, शिल्पा शायलाने जिंकले कांस्य

पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताचा ऐतिहासिक डंका: शर्मिला धनखडची सुवर्ण कामगिरी, शिल्पा शायलाने जिंकले कांस्य

July 28, 2026
औरंगाबादमध्ये दूषित पाणीपुरवठ्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे जनआक्रोश आंदोलन; समस्या न सुटल्यास पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा

औरंगाबादमध्ये दूषित पाणीपुरवठ्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे जनआक्रोश आंदोलन; समस्या न सुटल्यास पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा

July 28, 2026
केवळ डिग्र्या पुरेशा नाहीत: विचारवंत नेतृत्वाची गरज

केवळ डिग्र्या पुरेशा नाहीत: विचारवंत नेतृत्वाची गरज

July 28, 2026
कॉमनवेल्थ गेम्स २०२६: वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवची दमदार कामगिरी, भारताला मिळवून दिले रौप्यपदक!

कॉमनवेल्थ गेम्स २०२६: वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवची दमदार कामगिरी, भारताला मिळवून दिले रौप्यपदक!

July 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home