मुंबई : ऐतिहासिक ‘दीक्षाभूमी’च्या चित्राशी छेडछाड युवक काँग्रेसकडून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंदुत्ववादी भगवा ध्वज दीक्षाभूमीवर लावल्याचे चित्र युवक काँग्रेसने तयार केले. यावर वंचित बहुजन आघाडीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. भाजप सारखी काँग्रेसही बौद्धांचा द्वेष करत असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडीने म्हटले की, आज नागपुरात युवक काँग्रेसचा नेता अजय चिकारा याने एका कार्यक्रमात ‘बेहतर नागपूर’ चा प्लान दाखवला. यामध्ये फोटोच्या माध्यमातून हे दाखवले गेले की, ‘बेहतर नागपूर’मध्ये दीक्षाभूमीवर हिंदुत्ववादी भगवा झेंडा राहील. (Dikshabhumi Bhagwa Flag Controversy)
Also Read : सोशल मीडिया युजर्ससाठी मोठी बातमी! इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी मेटाने आणले ‘पेड सबस्क्रिप्शन’ प्लॅन्स
ज्यांनी हे दाखवले ते काही छोटे नेता नाहीयेत ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा आहेत.काँग्रेस पक्ष ‘बेहतर नागपूर’च्या माध्यमातून हे सांगत आहे की, दीक्षाभूमीवर बौद्धांचा पंचशील झेंड्याऐवजी हिंदुत्ववाद्यांचा भगवा झेंडा फडकेल, हा यांचा सांगण्याचा अर्थ आहे. वंचित बहुजन आघाडी ह्या घृणास्पद कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करते.
या लोकांविरोधात SC/ST अट्रोसिटी कायद्याअंतर्गत कारवाई, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने आणि जगभरातील बौद्धांचे प्रेरणास्थान असलेले दिक्षाभूमी, आणि बौद्धांचा असा अपमान करणाऱ्या लोकांविरोधात कारवाई करण्याची मागणी करत आहोत. या संदर्भातील कार्यवाही वंचित बहुजन आघाडी नागपूर शहर कार्यकारिणी लवकरच करणार आल्याचेही वंचित बहुजन आघाडीने सांगितले. (Dikshabhumi Bhagwa Flag Controversy)
Also Read : NEET पेपर फुटीप्रकरणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन
हाच आहे काँग्रेसचा खरा चेहरा. काँग्रेस भाजपासारखे बौद्धांचा द्वेष करते, यात दुमत नाही. असे म्हणत बौद्धांना सतर्क राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले.





