Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘मुसलमानों का सियासी अजेंडा’ पुस्तकाचे प्रकाशन; मुस्लिम राजकारणावर मांडली रोखठोक मते

mosami kewat by mosami kewat
May 9, 2026
in बातमी, राजकीय, सांस्कृतिक
0
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘मुसलमानों का सियासी अजेंडा’ पुस्तकाचे प्रकाशन; मुस्लिम राजकारणावर मांडली रोखठोक मते
       

मुंबई: प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस प्रकाशित आणि फारुख अहमद लिखित मुसलमानों का सियासी अजेंडा या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा प्रबुद्ध भारतचे संपादक ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आंबेडकर भवन दादर, मुंबई येथे उत्साहात पार पडले. या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील विचारवंत आणि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य करत मुस्लिम समाजाच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, आसाम आणि बंगाल निवडणुकीच्या दोन महिन्यांपूर्वीच मी सांगितले होते की, बंगालमध्ये भाजप १८०-९० जागा जिंकेल आणि तेच घडले. आरएसएस आणि भाजप मला हात लावू शकत नाही, कारण मी फकीर आहे. मुस्लिमांच्या राजकीय भूमिकेवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, मुस्लिमांच्या राजकीय विचारांवर आजही मौलवींचे नियंत्रण आहे, हे कटू सत्य आहे. सध्या मुस्लिम समाज हा सर्वात मोठा टार्गेट असून, इथला नरसंहार रोखणे हे मुस्लिमांच्याच हातात असल्याचे त्यांनी नमूद केले. फारुख अहमद यांच्या पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी आवाहन केले की, हे पुस्तक प्रत्येक वस्त्यांमध्ये वाचले गेले पाहिजे आणि यावर मुस्लिम मौलवींसोबत चर्चा झाली पाहिजे. (Musalmanon Ka Siyasi Agenda Book Released)

या कार्यक्रमात सुजात आंबेडकर यांनी या पुस्तकाचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, भारताच्या इतिहासात जेव्हा जेव्हा मुसलमानांवर अन्याय झाला, तेव्हा विविध संघटना आणि चळवळींनी भाजप-आरएसएस विरोधात उभे राहत मुस्लिम समाजाची बाजू घेतली. या संघर्षाचे डॉक्युमेंटेशन होणे हे पुढील पिढ्यांसाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

कार्यक्रमात उपस्थित इतर वक्त्यांनीही आपले विचार मांडले. द वायरच्या संपादिका आरफा खानुम शेरवानी यांनी मतदारांच्या अधिकारांवर होणाऱ्या गदेबद्दल चिंता व्यक्त केली, तर माजी आयपीएस अधिकारी अब्दूर रेहमान यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली. पत्रकार नवीन कुमार यांनी समानता फक्त आंबेडकरवादी चळवळीत असल्याचे सांगून संविधान जागृतीचा अभाव अधोरेखित केला. कॉ. स्मिता पानसरे यांनी दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिम यांच्या संयुक्त राजकीय ताकदीवर भर दिला. पुस्तकाचे लेखक फारुख अहमद आणि इतिहास अभ्यासक सरफराज अहमद यांनीही मुस्लिम समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वावर आपली मते मांडली. (Musalmanon Ka Siyasi Agenda Book Released)

या प्रकाशन सोहळ्याला अंजलीताई आंबेडकर (कार्यकारी संपादक, प्रबुद्ध भारत), रेखाताई ठाकूर (प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी), जनाब मुज्तबा फारुक (राष्ट्रीय सल्लागार समिती सदस्य, जमाअत-ए-इस्लामी, नवी दिल्ली), आरफा खानम शेरवानी (संपादक, द वायर), अब्दुर रेहमान (माजी आयपीएस व लेखक), कॉ. स्मिता गोविंद पानसरे (साम्यवादी नेत्या), सरफराज अहमद (इतिहास अभ्यासक), कलिम अजिम (लेखक व साहित्यिक) आणि नवीन कुमार (संपादक, आर्टिकल १९ इंडिया) या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.


       
Tags: BookBook launchMaharashtramumbaiMusalmanon Ka Siyasi Agenda Book ReleasedPoliticalPrakash AmbedkarSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले ‘भूमिका’ नाटकाचे कौतुक

Next Post
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले ‘भूमिका’ नाटकाचे कौतुक

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले 'भूमिका' नाटकाचे कौतुक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मोझरी, कौंडण्यपूरचा वारंवार विकास; भीमटेकडी मात्र उपेक्षित का? तिवसा मतदारसंघात विकासाची अस्पृश्यता कायम असल्याचा सागर भवतेंचा आरोप
बातमी

मोझरी, कौंडण्यपूरचा वारंवार विकास; भीमटेकडी मात्र उपेक्षित का? तिवसा मतदारसंघात विकासाची अस्पृश्यता कायम असल्याचा सागर भवतेंचा आरोप

by mosami kewat
June 27, 2026
0

तिवसा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी गुरुकुंज मोझरी, माता रुक्मिणीचे माहेरघर कौंडण्यपूर आणि संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव या धार्मिक स्थळांच्या...

Read moreDetails
मांगली (गोसाई) गावातील गरीब कुटुंबांना बेघर करण्याचे षड्यंत्र; वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची भेट

मांगली (गोसाई) गावातील गरीब कुटुंबांना बेघर करण्याचे षड्यंत्र; वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची भेट

June 27, 2026
जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफॉर्मर तात्काळ दुरुस्त करा; अन्यथा नागरिकांच्या रोषाला प्रशासन जबाबदार राहील : निलेश देव

जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफॉर्मर तात्काळ दुरुस्त करा; अन्यथा नागरिकांच्या रोषाला प्रशासन जबाबदार राहील : निलेश देव

June 27, 2026
विजेचा शॉक लागलेल्या युवकाचे प्राण वाचविण्यासाठी संजय नाईक धावले ; माणुसकीचे दर्शन

विजेचा शॉक लागलेल्या युवकाचे प्राण वाचविण्यासाठी संजय नाईक धावले ; माणुसकीचे दर्शन

June 27, 2026
लेकीच्या मंगल परिणयाचे औचित्य साधत ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकास पाच हजारांची देणगी!

लेकीच्या मंगल परिणयाचे औचित्य साधत ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकास पाच हजारांची देणगी!

June 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home