Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात; मुख्यमंत्र्यांनी तरी दिवाळी साजरी करावी!

mosami kewat by mosami kewat
October 20, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात; मुख्यमंत्र्यांनी तरी दिवाळी साजरी करावी!
       

यवतमाळ : अतिवृष्टी, नापिकी, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक संकटामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला असताना राज्य सरकारच्या भूमिकेचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा यवतमाळ नगरपरिषदेचे गटनेते डॉ. नीरज वाघमारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चक्क पाच हजार रुपयांची मनीऑर्डर पाठवली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या प्रतीकात्मक आंदोलनातून त्यांनी सरकारच्या शेतकरीविषयक धोरणांवर उपरोधिक प्रहार केला आहे.

सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी यवतमाळ मुख्य टपाल कार्यालयातून सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील पत्त्यावर पाच हजार रुपयांची इलेक्ट्रॉनिक मनीऑर्डर पाठविण्यात आली. त्यासाठी २५० रुपये कमिशनसह एकूण ५,२५० रुपये अदा करण्यात आले. या व्यवहाराची अधिकृत टपाल पावतीदेखील उपलब्ध आहे.

“महाराष्ट्राचा पोशिंदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याच्या घरात दिवाळीचा दिवा पेटेल की नाही, याची शाश्वती नाही. शेतकऱ्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद नाही, कुटुंबावर कर्जाचा डोंगर आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री महोदयांच्या दिवाळीत तरी पैशांची कमतरता पडू नये, म्हणून त्यांना पाच हजार रुपये पाठवले आहेत,” अशा उपरोधिक शब्दांत डॉ. वाघमारे यांनी सरकारच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे, नुकसानभरपाई, कर्जमुक्ती आणि आर्थिक मदतीच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

“शेतकऱ्यांच्या घरात अंधार आणि सत्ताधाऱ्यांच्या घरात रोषणाई, ही कसली लोकशाही? शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसता येत नसतील, तर किमान त्यांच्या वेदनांची जाणीव तरी राज्यकर्त्यांनी ठेवावी. मुख्यमंत्री महोदय, आमचे पाच हजार रुपये घ्या, तुमची दिवाळी साजरी करा; पण बळीराजाच्या उद्ध्वस्त संसाराचे काय?” असा सवाल डॉ. वाघमारे यांनी उपस्थित केला.

“ही मनीऑर्डर मुख्यमंत्र्यांना आर्थिक मदत करण्यासाठी नव्हे, तर शेतकऱ्यांच्या वेदना सरकारच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. बळीराजाच्या घरात दिवा पेटल्याशिवाय महाराष्ट्राची दिवाळी उजळली, असे म्हणता येणार नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली.


       
Tags: Devendra FadanvisMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aghadiयवतमाळ
Previous Post

सिंचन, वृक्ष लागवड, भूजल संवर्धन, पाणी पुरवठा योजनांमधील भ्रष्टाचारामुळे राज्यात अभूतपूर्व दुष्काळ – राजेंद्र पातोडे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात; मुख्यमंत्र्यांनी तरी दिवाळी साजरी करावी!
बातमी

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात; मुख्यमंत्र्यांनी तरी दिवाळी साजरी करावी!

by mosami kewat
October 20, 2026
0

यवतमाळ : अतिवृष्टी, नापिकी, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक संकटामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला असताना राज्य सरकारच्या भूमिकेचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवत...

Read moreDetails
सिंचन, वृक्ष लागवड, भूजल संवर्धन, पाणी पुरवठा योजनांमधील भ्रष्टाचारामुळे राज्यात अभूतपूर्व दुष्काळ – राजेंद्र पातोडे

सिंचन, वृक्ष लागवड, भूजल संवर्धन, पाणी पुरवठा योजनांमधील भ्रष्टाचारामुळे राज्यात अभूतपूर्व दुष्काळ – राजेंद्र पातोडे

October 19, 2026
वसई-विरार: सुजात आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; वंचित बहुजन आघाडी आक्रमक, अभिनव परब यांच्या कार्यालयाला फासले काळे

वसई-विरार: सुजात आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; वंचित बहुजन आघाडी आक्रमक, अभिनव परब यांच्या कार्यालयाला फासले काळे

October 19, 2026
Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; दोन जण जखमी

Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; दोन जण जखमी

October 18, 2026
साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्तक्षेपानंतर सुटका

साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्तक्षेपानंतर सुटका

October 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home