Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मांडेगाव येथे बुद्ध पौर्णिमा व संस्कार वर्गाचे उत्साहात आयोजन; मीराताई आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा

mosami kewat by mosami kewat
May 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मांडेगाव येथे बुद्ध पौर्णिमा व संस्कार वर्गाचे उत्साहात आयोजन; मीराताई आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा
       
Solapur: भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल सोलापूर जिल्ह्यातील पहिली ग्रामशाखा मांडेगाव (ता. बार्शी) येथे विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम उत्साहात पार पडले. येथील जयभीम बुद्ध विहार येथे १ मे (बुद्ध पौर्णिमा) पासून ५ मे पर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ५ दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

या शिबिराला ‘संस्कार वर्ग’ असे नाव देण्यात आले असून, यात दररोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत मुलांना पाली भाषा व मराठी अनुवादाचे प्रशिक्षण देण्यात आले. लहान मुलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ग्रामस्थांनी हे संस्कार वर्ग वर्षभर शालेय शिक्षणासोबतच सुरू ठेवावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बुद्धरुपास पुष्प वाहून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालून आणि बुद्ध वंदनेने करण्यात आली. कार्यक्रमाच्या सांगता समारंभात विविध मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यामध्ये पोटनिवडणुकीत सरपंच म्हणून निवडून आलेल्या मीराताई देवदत्त मिरगणे यांना भारतीय संविधान देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पंढरपूरच्या माजी नगराध्यक्षा उज्वलाताई महादेव भालेराव यांनी त्यांच्या कार्यकाळात १० एकर जागा बुद्ध विहारासाठी राखीव ठेवल्याबद्दल त्यांचाही विशेष गौरव करण्यात आला. मुंबई पोलीस दलात भरती झाल्याबद्दल अधिराज भालेराव यांचाही सत्कार करण्यात आला.५ मे रोजी महाउपासिका मीराताई आंबेडकर यांचा वाढदिवस केक कापून आणि लहान मुलांना वाटप करून साजरा करण्यात आला.

 या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन जयभीम बुद्ध विहार मांडेगावची कार्यकारणी, अध्यक्ष रामभाऊ सोनवणे, सरचिटणीस कैलास सोनवणे, कोषाध्यक्ष राजेंद्र खुरंगळे, कार्यालयीन सचिव अमृतानंद सोनवणे आणि हिशोब तपासनीस रणजीत सोनवणे यांनी केले होते. याप्रसंगी बौद्धाचार्य ज्ञानदेव सोनवणे, राहुल ढावरे, गणेश चव्हाण, मंगल सोनवणे, रेखा सोनवणे, उर्मिला सोनवणे, करुणा सोनवणे, शीला जावळे, शोभा सोनवणे, येमा खुरंगळे, गौतम सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी खीर दान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Tags: BuddhistMaharashtrasolapur
Previous Post

इराण युद्ध: पडद्यामागचा चीन, आता स्टेज वर!

Next Post

एमपीएससीचा आरक्षणावर पुन्हा घाला ? पशुवैद्यकीय अधिकारी गट-अ मधील SC प्रवर्गाचे १ पद कमी; विद्यार्थ्यांमध्ये संताप

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
विदर्भात २४ तासांत पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या; कर्जबाजारीपणा आणि नापिकीचे संकट गंभीर
बातमी

विदर्भात २४ तासांत पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या; कर्जबाजारीपणा आणि नापिकीचे संकट गंभीर

by mosami kewat
September 6, 2026
0

भेंडीला दोन रुपये किलो भाव अमरावती : विदर्भातील शेतकरी संकटाचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले आहे. अमरावती, वाशीम आणि यवतमाळ...

Read moreDetails
धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम

धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम

September 6, 2026
रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी

रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 6, 2026
तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!

तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!

September 6, 2026
दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

September 6, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home