Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

एमपीएससीचा आरक्षणावर पुन्हा घाला ? पशुवैद्यकीय अधिकारी गट-अ मधील SC प्रवर्गाचे १ पद कमी; विद्यार्थ्यांमध्ये संताप

mosami kewat by mosami kewat
May 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
एमपीएससीचा आरक्षणावर पुन्हा घाला ? पशुवैद्यकीय अधिकारी गट-अ मधील SC प्रवर्गाचे १ पद कमी; विद्यार्थ्यांमध्ये संताप
       
MPSC 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) यापूर्वी गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मध्ये अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी जागा शून्य ठेवल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ संदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी गट-अ मधील SC प्रवर्गाचे १ पद कमी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. आधीच मर्यादित संधी, प्रचंड स्पर्धा आणि वर्षानुवर्षांची मेहनत असताना आरक्षणातील जागा कमी करण्याचा निर्णय नेमका कोणाच्या हितासाठी घेतला जात आहे? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

आरक्षण हा संविधानाने दिलेला अधिकार असताना, वारंवार SC प्रवर्गाच्या जागांमध्ये कपात होणे ही केवळ तांत्रिक चूक नसून सामाजिक न्यायाच्या तत्वांवर आघात असल्याची भावना उमटत आहे. “एका बाजूला सामाजिक समतेच्या घोषणा आणि दुसऱ्या बाजूला मागास घटकांच्या संधी कमी करण्याचे धोरण” असा आरोपही विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.

वंचित बहुजन आघाडीने यापूर्वीच एमपीएससीच्या आरक्षण धोरणावर प्रश्न उपस्थित केले होते. आता पुन्हा SC प्रवर्गाचे पद कमी झाल्याने आयोग आणि राज्य सरकारने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे, कमी केलेले पद पूर्ववत करावे आणि आरक्षणाबाबत पारदर्शक भूमिका जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Tags: EducationMPSCMPSC 2026
Previous Post

मांडेगाव येथे बुद्ध पौर्णिमा व संस्कार वर्गाचे उत्साहात आयोजन; मीराताई आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा

Next Post

सावरगावातील अत्याचार प्रकरणाने जिल्हा हादरला; नराधमाला तात्काळ अटक करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन
बातमी

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

by mosami kewat
September 28, 2026
0

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक विस्ताराला चालना देत औरंगाबाद पश्चिम जिल्ह्यांतर्गत गंगापूर तालुक्यातील हरिप्रसाद नगर, जोगेश्वरी येथे वंचित बहुजन...

Read moreDetails
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

September 28, 2026
औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!

औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!

September 28, 2026
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे

September 28, 2026
सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home