Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सावरगावातील अत्याचार प्रकरणाने जिल्हा हादरला; नराधमाला तात्काळ अटक करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी

mosami kewat by mosami kewat
May 7, 2026
in बातमी, राजकीय
0
सावरगावातील अत्याचार प्रकरणाने जिल्हा हादरला; नराधमाला तात्काळ अटक करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी
       
पातूर : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत सावरगाव येथे एका १० वर्षांच्या चिमुकलीवर त्याच गावातील नराधमाने सतत ३ दिवस अत्याचार केल्याची अत्यंत निंदनीय व क्रूर घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. सदर प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार असून, त्याला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज पीडित मुलीची व तिच्या कुटुंबीयांची भेट घेण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने पीडित कुटुंबाचे सांत्वन करत त्यांना आधार दिला. त्यानंतर, घटनास्थळी उपस्थित असलेले उप जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांची भेट घेऊन आरोपीला लवकरात लवकर बेड्या ठोकण्याची मागणी करण्यात आली. 

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला जिल्हाध्यक्ष आम्रपालीताई खंडारे, जि. प. गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, महानगर अध्यक्ष मजहर खान, महासचिव गजानन गवई, पातुर तालुकाध्यक्ष डॉ. ओमप्रकाश धर्माळ, बार्शिटाकळी तालुकाध्यक्ष गोरसिंग राठोड, माजी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशिव, ज्येष्ठ नेते चरणसिंग चव्हाण, अॅड. किरण सरदार, चंद्रकांत तायडे, सुभाष चिपडे, प्रविण इंगळे, शिलवंत उपर्वट, दुर्गा अवचार, आशाताई मोहोळ, अक्षरा अवचार आणि धनराज चव्हाण यांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या नराधम आरोपीला कडक शासन होईपर्यंत वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Tags: Justice For Sawargaon GirlMaharashtraPaturVanchi bahujan aghadi
Previous Post

एमपीएससीचा आरक्षणावर पुन्हा घाला ? पशुवैद्यकीय अधिकारी गट-अ मधील SC प्रवर्गाचे १ पद कमी; विद्यार्थ्यांमध्ये संताप

Next Post

अकोल्यातील वंचितच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्णा शिरसाट यांचे निधन; अंजलीताई आंबेडकरांकडून भावूक श्रद्धांजली

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन
बातमी

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

by mosami kewat
September 28, 2026
0

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक विस्ताराला चालना देत औरंगाबाद पश्चिम जिल्ह्यांतर्गत गंगापूर तालुक्यातील हरिप्रसाद नगर, जोगेश्वरी येथे वंचित बहुजन...

Read moreDetails
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

September 28, 2026
औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!

औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!

September 28, 2026
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे

September 28, 2026
सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home