Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अकोल्यातील वंचितच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्णा शिरसाट यांचे निधन; अंजलीताई आंबेडकरांकडून भावूक श्रद्धांजली

mosami kewat by mosami kewat
May 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अकोल्यातील वंचितच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्णा शिरसाट यांचे निधन; अंजलीताई आंबेडकरांकडून भावूक श्रद्धांजली
       
अकोला :भारिप-बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या चळवळीसाठी अकोला जिल्ह्यात आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्णा शिरसाट यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनावर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी अत्यंत भावूक शब्दांत श्रद्धांजली अर्पण करत, चळवळीतील एका निष्ठावान पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली आहे.

अंजलीताईंनी शिरसाट यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, सम्यक भारिपच्या कालखंडापासून ज्या कार्यकर्त्यांनी आणि कुटुंबांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते, त्यातील मनकर्णा शिरसाट हे एक महत्त्वाचे नाव होते. त्या काळी एस.टी.ने प्रवास करून किंवा पायी फिरून प्रचार करणे, बैठकांसाठी रात्रीतून १००-१०० पत्रे हाताने लिहून काढणे, मोर्चे आणि आंदोलने यात त्या सदैव अग्रभागी असत. 

निवडणूक लोकसभेची असो किंवा ग्रामपंचायतीची आणि उमेदवार कोणत्याही समाजाचा असो, शिरसाट यांचा जोश कधीही कमी होत नसे.चळवळ उभी करताना लागणारी जिद्द आणि वैचारिक बांधिलकी त्यांच्यात उपजत होती. विशेष म्हणजे, इतके कष्ट करूनही त्यांच्या मनात कोणताही अभिनिवेश किंवा सत्तेची अपेक्षा नव्हती; असायचा तो केवळ आपला पक्ष जिल्ह्यात सत्तेत असल्याचा निखळ अभिमान. 

त्यांच्या निधनाने चळवळीचा एक कष्टकरी आणि निस्वार्थ आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. अंजलीताई आंबेडकर यांनी त्यांना आदरपूर्वक प्रेमाचा आणि मानाचा जयभीम अर्पण केला आहे.

Tags: AkolaAnjali AmbedkarMaharashtra
Previous Post

सावरगावातील अत्याचार प्रकरणाने जिल्हा हादरला; नराधमाला तात्काळ अटक करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी

Next Post

तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी TVK ने साधला विविध राजकीय पक्षांशी संवाद 

Next Post
तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी TVK ने साधला विविध राजकीय पक्षांशी संवाद 

तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी TVK ने साधला विविध राजकीय पक्षांशी संवाद 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन
बातमी

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

by mosami kewat
September 28, 2026
0

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक विस्ताराला चालना देत औरंगाबाद पश्चिम जिल्ह्यांतर्गत गंगापूर तालुक्यातील हरिप्रसाद नगर, जोगेश्वरी येथे वंचित बहुजन...

Read moreDetails
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

September 28, 2026
औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!

औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!

September 28, 2026
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे

September 28, 2026
सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home