Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

टाकळी प्रदे येथील घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा; आमदार मंगेश चव्हाणांची दडपशाही !

mosami kewat by mosami kewat
April 28, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
टाकळी प्रदे येथील घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा; आमदार मंगेश चव्हाणांची दडपशाही !
       
Chalisgaon : चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्रडे येथे १४ एप्रिल रोजी घडलेल्या दगडफेक प्रकरणाच्या निषेधार्थ आणि दलित बांधवांवर दाखल करण्यात आलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चादरम्यान टाकळी प्रदे येथील १४ एप्रिलच्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. काही समाजकंटकांकडून दगडफेक घडवून आणण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तसेच चाळीसगाव तालुकाध्यक्ष संदीप कांबळे यांना आमदार मंगेश चव्हाण यांनी “तू तोच का संदीप कांबळे, थांब तुझा कार्यक्रम लावतो,” अशा शब्दांत धमकी देत तणाव निर्माण करणारे वक्तव्य केल्याचे  पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी दडपशाही करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत, पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून दलित बांधवांवर कलम ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आल्याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. हे गुन्हे मागे घ्यावेत, संबंधितांवर कारवाई व्हावी आणि दलित समाजावर अन्याय करणाऱ्यांना संरक्षण देऊ नये, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.

या मोर्चात राज्य कार्यकारिणी सदस्य शमिभाताई पाटील, ईश्वर पाटील (लाला सर), जिल्हाध्यक्ष पश्चिम शंकर अण्णा खरात, धुळे जिल्हा संघटक आबा निकुभे, नंदुरबार युवा जिल्हाध्यक्ष अमित तडवी, जळगाव पश्चिम महासचिव राहुल इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल दादा लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष दयाराम मोरे, पारोळा तालुकाध्यक्ष संदीप जाधव, पाचोरा तालुकाध्यक्ष गोकुळ सन्सारे, भडगाव तालुकाध्यक्ष हसराज पगारे, तालुका महासचिव चेतन पवार, तालुका उपाध्यक्ष विकास बागुल, उपाध्यक्ष कलीम सय्यद, संघटक सुरेश जगताप, सागर देवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: ChalisgaonMaharashtraPolitical
Previous Post

रयतेच्या राजाची बदनामी कराल, तर याद राखा !

Next Post

मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचला भाऊ; १९,३०० रुपयांसाठी व्यवस्थेविरुद्ध आदिवासीचा मूक आक्रोश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
August 31, 2026
0

पुणे : आदिवासी भटके विमुक्तांनी देशाच्या आणि राज्याच्या निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण केली पाहिजे तरच तुम्हाला तुमचे हक्क आणि...

Read moreDetails
लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा

लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा

August 31, 2026
पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

August 31, 2026
वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

August 31, 2026
उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

August 31, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home