Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शिक्षणमंत्री दादा भुसे विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; मंत्र्याच्या घराबाहेर आंदोलन!

mosami kewat by mosami kewat
July 1, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
शिक्षणमंत्री दादा भुसे विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; मंत्र्याच्या घराबाहेर आंदोलन!
       

मालेगाव : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) प्रश्नपत्रिका परीक्षा होण्याच्या अवघ्या २४ तासांपूर्वी फुटल्याच्या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाने शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करत मालेगाव येथील त्यांच्या घराबाहेर तीव्र आंदोलन केले. या पेपरफुटीमुळे ६ लाखांहून अधिक शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांचे शैक्षणिक भविष्य संकटात आले आहे.

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे यावेळी बोलतांना म्हणाले की, राज्यातील परीक्षा व्यवस्थेत पेपरफुटी ही आता अपवादात्मक घटना राहिलेली नसून ती सातत्याने घडणारी गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी वारंवार खेळ होत असून सरकारची निष्काळजी भूमिका याला जबाबदार आहे.

प्रशासनाच्या वतीने तहसीलदार यांनी लेखी आश्वासन देऊन ४ जुलै रोजी शिक्षणमंत्री यांच्यासोबत सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित केली आहे.

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या प्रमुख मागण्या :

१) राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा.

२) पेपरफुटी प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी. दोषी अधिकारी व संबंधित व्यक्तींना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.

३) रद्द झालेल्या परीक्षेसाठी उमेदवारांनी केलेल्या प्रवास, निवास व इतर खर्चाची संपूर्ण भरपाई शासनाने करावी.

४) परीक्षेमुळे प्रभावित सर्व उमेदवारांना वयोमर्यादीत सवलत व पात्रतेची मुदतवाढ देण्यात यावी.

५) २०२१ पूर्वी नियुक्त शिक्षकांच्या टीईटी निकषांऐवजी त्यांच्या अनुभव व अध्यापन कौशल्यावर आधारित स्वतंत्र क्षमता चाचणी घेण्यात यावी.

सम्यक विद्यार्थी आंदोलनाने इशारा दिला आहे की, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड सहन केली जाणार नाही, असा निर्धारही आंदोलनाने व्यक्त केला आहे.

यावेळी सम्यक चे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे, राज्य कार्यकारिणी सदस्य जितरत्न पटाईत, नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष दीपक पवार, युवा जिल्हाध्यक्ष शशी पवार, नाशिक सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष मिहीर गजबे,  कुणाल पिंपळे, संदिप महिरे, जेरी बागुल, विजय बागुल, सचिन अहिरे, शुभम म्हसदे, दीपक पानपाटील, दीपक उशीरे, निलेश जगताप, शब्बीर शेख, शंकर खरात, संदीप रामराजे, पावबा आखाडे, आबा निकम, सिद्धार्थ बागुल यांच्यासह मोठ्या संख्येने TET परिक्षार्थी, विद्यार्थी उपस्थित होते.


       
Tags: AndolanMAHA TET Paper LeakMaharashtraPaperLeakScamPoliticalprotestTet
Previous Post

रिकामे महाल, बेघर नागरिक: K-शेप अर्थव्यवस्थेचे भीषण चित्र

Next Post

सुखदेव जी महाराजांना ॲड. प्रकाश आंबेडकर यांची श्रद्धांजली; समाज प्रबोधनातील योगदानाला सलाम

Next Post
सुखदेव जी महाराजांना ॲड. प्रकाश आंबेडकर यांची श्रद्धांजली; समाज प्रबोधनातील योगदानाला सलाम

सुखदेव जी महाराजांना ॲड. प्रकाश आंबेडकर यांची श्रद्धांजली; समाज प्रबोधनातील योगदानाला सलाम

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home