Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Aurangabad : वंचित बहुजन आघाडी आक्रमक; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गाडी अडवली

mosami kewat by mosami kewat
July 1, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
Aurangabad : वंचित बहुजन आघाडी आक्रमक; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गाडी अडवली

Aurangabad : वंचित बहुजन आघाडी आक्रमक; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गाडी अडवली

औरंगाबाद : वाळूज (ता. गंगापूर) येथील समता कॉलनी भागात एका प्रस्थापित शिक्षण सम्राटाने निळ्या झेंड्याशेजारी केलेले अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी भोडवे यांना निलंबित करावे आणि सदर अतिक्रमण तात्काळ हटवावे, या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत तीव्र आंदोलन करण्यात आले.

वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी थेट सभेत घुसून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांना जाब विचारला. यावेळी निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी मध्यस्थी केली, तसेच शिक्षण संस्था चालकाचे ते अतिक्रमण तात्काळ हटविण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर केला. सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर झाला असला तरी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे यामुळे समाधान झाले नाही. (Vanchit Bahujan Aaghadi)

मुंबईतील शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी

सभा संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांची गाडी अडवली. संबंधित निष्काळजी ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी (पंचायत) यांच्यावर नेमकी कधी कारवाई करणार, अशी रोखठोक विचारणा करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. याबाबत अधिक माहिती अशी की, या अतिक्रमणाविरोधात वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने पंधरा दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते.

त्यावेळी ग्रामपंचायत अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी २५ जूनपर्यंत हे अतिक्रमण हटविण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, २५ जून उलटून गेल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. उलट, ग्रामपंचायत अधिकारी कार्यालयात येणे टाळत आहेत आणि विस्तार अधिकारी फोन उचलत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप होता. आज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणात “मला एक दिवसाची वेळ द्या, मी योग्य ती कायदेशीर कारवाई करते,” असे ठोस आश्वासन दिल्यानंतर वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी रस्ता मोकळा केला. (Vanchit Bahujan Aaghadi)

Also Read : वंचित बहुजन आघाडीचा अक्कलकोट नगरपरिषदेला अर्धनग्न आंदोलनाचा इशारा

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, शहराध्यक्ष (मध्य) मिलिंद बोर्डे, युवा शहराध्यक्ष (पश्चिम) राहुल मकासरे, जिल्हा महासचिव सुरज मुळे पाटील, जिल्हा महासचिव इक्बाल शेख, शहर महासचिव (मध्य) आनंद शेजुळ, जिल्हा संघटक राजन कीर्तने, साहेबराव दाभाडे, गंगापूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब दुशिंग, शुभम जंगे, ज्योती जाधव, इंदुबाई जंगे, सरला जाधव, संतोष जमदाडे, राहुल हिवाळे, देवा वानखेडे, भास्कर खंडागळे, आलोक टोमके, निखिल खरात, सुमित जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, युवक व कार्यकर्ते उपस्थित होते. ##Aurangabad

Tags: Blue FlagEncroachmentgangapurprotestVanchit Bahujan AghadiWalujZilla Parishad
Previous Post

मुंबईतील शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी

Next Post

रिकामे महाल, बेघर नागरिक: K-शेप अर्थव्यवस्थेचे भीषण चित्र

Next Post
रिकामे महाल, बेघर नागरिक: K-शेप अर्थव्यवस्थेचे भीषण चित्र

रिकामे महाल, बेघर नागरिक: K-शेप अर्थव्यवस्थेचे भीषण चित्र

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी
बातमी

हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

by mosami kewat
September 7, 2026
0

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, याची पाहणी...

Read moreDetails
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

September 7, 2026
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

September 7, 2026
तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा 'Gen-Z' कनेक्ट

तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट

September 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home