Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीचा अक्कलकोट नगरपरिषदेला अर्धनग्न आंदोलनाचा इशारा

mosami kewat by mosami kewat
June 30, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडीचा अक्कलकोट नगरपरिषदेला अर्धनग्न आंदोलनाचा इशारा
       
अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील ड्रेनेजच्या कामानंतर तातडीने रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात यावे तसेच शहराला दर चार दिवसांनी नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या अक्कलकोट शहर व तालुका शाखेच्या वतीने अक्कलकोट नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले. मागण्या आठ दिवसांत पूर्ण न झाल्यास नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.

अक्कलकोट शहरात सध्या ड्रेनेजच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी पाइपलाइन टाकून महिनाभराहून अधिक कालावधी उलटूनही रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे शहरात धुळीचा समस्या निर्माण झाले असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. धुळीमुळे श्वसनाचे आजार, दमा, सायनस यांसारख्या आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांतून हजारो भाविक अक्कलकोटमध्ये येत असतात. अशा परिस्थितीत ड्रेनेजचे काम पूर्ण झाल्यानंतर तात्काळ रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे आवश्यक असताना नगरपरिषद या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

याशिवाय शहरातील पाणीटंचाईचाही प्रश्न गंभीर असून नागरिकांना १५ ते २० दिवसांनी एकदाच पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप करण्यात आला. हा पाणीपुरवठा दर चार दिवसांनी नियमित करण्यात यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे अर्धनग्न आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडी खांबे, तालुकाध्यक्ष विशाल ठोंबरे, युवक शहराध्यक्ष संदीप बाळ शंकर, जिल्हा उपाध्यक्ष देवानंद अस्वले, तालुका उपाध्यक्ष यशवंत शेठ इंगळे, तालुका महासचिव नागेश हरवाळकर तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: akkalkotMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aghadi
Previous Post

तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम; राज्यभरात ३१ छापे, १९ जणांना अटक!

Next Post

मुंबईतील शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी महापौर-आयुक्तांची पाहणी; जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश
बातमी

सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी महापौर-आयुक्तांची पाहणी; जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश

by mosami kewat
September 21, 2026
0

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक जनाब जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नातून शहरातील ऐतिहासिक डॉ. सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरण प्रकल्पाला चालना...

Read moreDetails
आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे – सुजात आंबेडकर 

आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे – सुजात आंबेडकर 

September 21, 2026
शेतक-याची लूट आणि कॉर्पोरेट उद्योगांना पायघड्या!

शेतक-याची लूट आणि कॉर्पोरेट उद्योगांना पायघड्या!

September 21, 2026
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

September 19, 2026
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home