Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नागपुरात निराधार योजनेचे 20 हजार लाभार्थी निधीपासून वंचित; वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

mosami kewat by mosami kewat
April 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नागपुरात निराधार योजनेचे 20 हजार लाभार्थी निधीपासून वंचित; वंचित बहुजन आघाडीचे निवेदन
       
Nagpur : महाराष्ट्र शासनाच्या श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अर्थसहाय्य निधी तातडीने वितरित करावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी अनुप खांडे यांना निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, नागपूर जिल्ह्यातील श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचे सुमारे 20 हजार गरजू लाभार्थी अर्थसहाय्य निधीपासून वंचित आहेत. निराधार ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती तसेच इतर लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाकडून ही मदत दिली जाते. मात्र निधी न मिळाल्याने अनेकांना मूलभूत गरजा भागविणे कठीण झाले आहे.

तसेच लाभार्थ्यांना तहसील कार्यालय व बँकांच्या वारंवार चकरा माराव्या लागत असून, त्यामुळे ते त्रस्त झाले असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

गरजू लाभार्थ्यांचा प्रलंबित निधी तातडीने मंजूर करून वितरित करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात आली. अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी जिल्हा कार्यालयीन सचिव वैभव येवले, आयटी सेल प्रमुख शुभम वाहने आदी उपस्थित होते.

Tags: MaharashtranagpurVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

जामखेडमध्ये ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन; आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध

Next Post

नाशिक मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून महिला कर्मचारी गंभीर जखमी

Next Post
नाशिक मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून महिला कर्मचारी गंभीर जखमी

नाशिक मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून महिला कर्मचारी गंभीर जखमी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 
बातमी

आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 

by mosami kewat
August 25, 2026
0

सुजात आंबेडकरांनी घेतली आंदोलक विद्यार्थ्यांची भेट! पुणे : "आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, तर ते शांत बसणार नाहीत. सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांचा...

Read moreDetails
अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

August 25, 2026
Breaking News :  पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

Breaking News : पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

August 25, 2026
धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

August 25, 2026
मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

August 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home