Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

प्रबुद्ध भारतच्या वृत्तावरून वाद; नोटीस पाठवा, मग बघू जितरत्न पटाईत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर !

mosami kewat by mosami kewat
April 25, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
प्रबुद्ध भारतच्या वृत्तावरून वाद; नोटीस पाठवा, मग बघू जितरत्न पटाईत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर !
       
मुंबई : प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसने २२ एप्रिल रोजी रात्री दोन वाजता उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे ट्विट केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या ट्विटवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी सूचक प्रतिक्रिया देत अप्रत्यक्ष दुजोरा दिल्याची चर्चा रंगली. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनीही यावर उडवाउडवीचे उत्तर दिल्याने या भेटीबाबत संशय अधिक गडद झाला.

दरम्यान, या वृत्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया देत प्रबुद्ध भारतवर कारवाईचा इशारा दिला असून संबंधित वृत्त खोटे असल्याचा दावा केला आहे. यावर प्रत्युत्तर देताना प्रबुद्ध भारतच्या वृत्त संपादक जीतरत्न पटाईत यांनी आक्रमक भूमिका घेत, “मुख्यमंत्री म्हणत आहेत बातमी खोटी आहे, नोटीस पाठवणार आहेत, तर येऊद्या नोटीस… मग बघू,” अशी ठाम प्रतिक्रिया दिली.

पटाईत यांनी पुढे मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना, “मुख्यमंत्र्यांनी याआधी किती लपूनछपून भेटी घेतल्या, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. अमृता फडणवीस यांनीदेखील विविध प्रसंगी त्याबाबत खुलासे केले आहेत,” असा दावा केला.

या प्रकरणामुळे पत्रकारिता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रबुद्ध भारतने मांडलेल्या वृत्तावरून राजकीय वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. आता या कथित नोटीसप्रकरणी पुढे काय घडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Tags: bjpDevendra FadanvisDr Babasaheb AmbedkarElectionPoliticalPrabuddh BharatPrabuddha Bharat RowUddhav Thackeray
Previous Post

दमोह: दलित नवरदेवाला घोड्यावरून खाली खेचून बेदम मारहाण; जातीवाचक शिवीगाळ करत वरात अडवली

Next Post

ट्रम्पने थुंकले अन् मोदींनी चाटले ; ट्रम्प- मोदी संबंधांवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पाटोदा साठवण तलावामुळे  दलित वस्तीतील १३१ कुटुंबांवर विस्थापनाचे संकट; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बातमी

पाटोदा साठवण तलावामुळे  दलित वस्तीतील १३१ कुटुंबांवर विस्थापनाचे संकट; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

by mosami kewat
June 26, 2026
0

जालना : मंठा तालुक्यातील लिंबेवडगाव येथील दलित वस्तीत वास्तव्यास असलेल्या १३१ कायम रहिवासी कुटुंबांवर पाटोदा साठवण तलाव प्रकल्पामुळे विस्थापनाचे संकट...

Read moreDetails
हे गढूळ पाणी कोणी पिऊन दाखवलं तर त्याचं गुलाबाचं फूल देऊन सत्कार करतो – पराग गवई

हे गढूळ पाणी कोणी पिऊन दाखवलं तर त्याचं गुलाबाचं फूल देऊन सत्कार करतो – पराग गवई

June 26, 2026
पोलिसांत जाऊन कम्प्लेंट करा, मारून पाठवीन ; खासदार संजय पाटलांची पत्रकारांना धमकी!

पोलिसांत जाऊन कम्प्लेंट करा, मारून पाठवीन ; खासदार संजय पाटलांची पत्रकारांना धमकी!

June 25, 2026
मायक्रो फायनान्सचे घटते आकडे: गरिबांच्या आर्थिक विस्थापनाची नांदी?

मायक्रो फायनान्सचे घटते आकडे: गरिबांच्या आर्थिक विस्थापनाची नांदी?

June 25, 2026
बीएमसीने बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीची तातडीच्या कारवाईची मागणी

बीएमसीने बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीची तातडीच्या कारवाईची मागणी

June 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home