Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ट्रम्पने थुंकले अन् मोदींनी चाटले ; ट्रम्प- मोदी संबंधांवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका

mosami kewat by mosami kewat
April 25, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
ट्रम्पने थुंकले अन् मोदींनी चाटले ; ट्रम्प- मोदी संबंधांवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका
       

Mumbai : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत परखड शब्दांत निशाणा साधत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मोदी सरकारने देशाच्या सार्थक धोरणाचे समर्पण केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये ॲड. आंबेडकर यांनी “थूकून चाटणे म्हणजे काय, हे मोदींच्या भूमिकेत दिसले; ट्रम्प यांनी थुंकले आणि मोदींनी चाटले,” अशा तीव्र शब्दांत टीका करत कथित राष्ट्रवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची थूक चाटायची आणि देशात राष्ट्रवादाच्या गप्पा मारायच्या, हा कसला राष्ट्रवाद?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (Prakash Ambedkar)

या ट्विटमध्ये त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रचारक राम माधव यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत, त्या विधानामुळे मोदी यांनी ट्रम्प यांच्यापुढे भारताची अर्थपूर्ण आणि स्वायत्त धोरणे समर्पित केल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा केला.

ॲड. आंबेडकर यांनी पुढे अत्यंत गंभीर आरोप करत पंतप्रधान मोदी यांना अमेरिका वैयक्तिक पातळीवर ब्लॅकमेल करत असल्यामुळेच हा तडजोडीचा मार्ग स्वीकारला गेला, असा आरोप केला. “मोदी कॉम्प्रोमाइज्ड आहेत,” असे म्हणत त्यांनी या परिस्थितीला राष्ट्रीय सार्वभौमत्वासाठी धोकादायक ठरवले.

पुढे त्यांनी इशारा देत म्हटले की, “अशा प्रकारे तडजोडीच्या भूमिकेत असलेले पंतप्रधान देशाला पुन्हा गुलाम बनवू शकतात,” असा गंभीर आरोप त्यांनी केला., (Prakash Ambedkar)

या ट्विटमधून ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर, राष्ट्रवादाच्या दाव्यांवर आणि अमेरिकेसोबतच्या संबंधांवर एकाचवेळी बहुआयामी आणि आक्रमक टीका केली असून, त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्याची शक्यता आहे.


       
Tags: Americanbjpdonald trampGlobal CrisisMaharashtranarendra modiPoliticalVanchit Bahujan Aaghadivbafotindia
Previous Post

प्रबुद्ध भारतच्या वृत्तावरून वाद; नोटीस पाठवा, मग बघू जितरत्न पटाईत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर !

Next Post

पुण्यात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन उत्साहात संपन्न

Next Post
पुण्यात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन उत्साहात संपन्न

पुण्यात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन उत्साहात संपन्न

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सोनम वांगचूक यांच्याशी संवाद साधणे ही भाजपची घटनात्मक जबाबदारी ; राहुल गांधींनी पाठिंबा द्यायला हवा होता - ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

सोनम वांगचूक यांच्याशी संवाद साधणे ही भाजपची घटनात्मक जबाबदारी ; राहुल गांधींनी पाठिंबा द्यायला हवा होता – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
July 16, 2026
0

नवी दिल्ली : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा...

Read moreDetails
Breaking News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट

Breaking News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट

July 16, 2026
आर्थिक विषमता: देशाच्या दीर्घकालीन आरोग्याला लागलेली वाळवी

आर्थिक विषमता: देशाच्या दीर्घकालीन आरोग्याला लागलेली वाळवी

July 16, 2026
जात प्रमाणपत्रासाठी श्रीगोंदा तहसील ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार 'लाँग मार्च': ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांचा इशारा

जात प्रमाणपत्रासाठी श्रीगोंदा तहसील ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार ‘लाँग मार्च’: ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांचा इशारा

July 16, 2026
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; पंचनाम्यांची मुदत वाढविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; पंचनाम्यांची मुदत वाढविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

July 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home