राज्यभरात वंचित बहुजन आघाडी ‘शिवाजी कोण होता’? पुस्तकाचे वाचन करणार
पुणे : कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक हे ‘कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, क्रांतीवीर छत्रपती’ ही शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा लोकांना समजू नये, असे आरएसएसला वाटते. असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, आरएसएस छावणीतील हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचे षडयंत्र रचले होते, ते षडयंत्र उद्ध्वस्त करण्याचे काम ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाने केले आहे.
“शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाची चर्चा आयोजित करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा, तालुका आणि महानगर समित्यांना करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.





