Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

हिंदू राष्ट्राची वल्गना करणाऱ्या धिरेंद्र शास्त्रीची आणि माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांची भेट !

Akash Shelar by Akash Shelar
April 22, 2026
in बातमी
0
हिंदू राष्ट्राची वल्गना करणाऱ्या धिरेंद्र शास्त्रीची आणि माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांची भेट !
       
सह कुटुंब भेट घेऊन घेतले आशीर्वाद

नवी दिल्ली : संविधानाच्या सर्वोच्च मूल्यांची शपथ घेऊन देशातील न्यायव्यवस्थेच्या उच्च पदावर विराजमान झालेल्या माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कृतीमुळे सध्या समाजात तीव्र चर्चा रंगली आहे. हिंदूराष्ट्राची उघडपणे वलग्ना करणाऱ्या आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या बागेश्वर धाम येथे त्यांनी कुटुंबासह भेट दिल्याने त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विशेष म्हणजे या धामाचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या कथित चमत्कारांमुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार करणाऱ्या देशात, अशा ठिकाणी जाऊन विधी करणे ही केवळ वैयक्तिक श्रद्धा नसून सार्वजनिक संदेश देणारी कृती ठरते. त्यामुळे “संविधान की श्रद्धा?” असा थेट सवाल उपस्थित होऊ लागला आहे. या मंचावर उपस्थिती लावून मा. न्यायमूर्ती सामान्य नागरिकांपर्यंत नेमका कोणता संदेश पोहोचतो? ही कृती प्रत्यक्षपणे अंधश्रद्धेला वैधता देणारी ठरत नाही का, असा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले आहे, “संविधानाच्या बळावर मोठ्या पदावर पोहोचलेल्या व्यक्तींनीच जर अंधश्रद्धेच्या बाजूने उभे राहायचे असेल, तर हा आंबेडकरी विचारधारेचा सरळ विश्वासघात आहे. समाजाने अशा दुटप्पी भूमिकांना ओळखून त्याला ठाम विरोध केला पाहिजे.”

Tags: Bageshwar DhamBhushan GavaiRajendra Patodesupreme court
Previous Post

आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या न्यायमूर्तींचे वैचारिक अध:पतन!

Next Post

प्रशासनात खळबळ: नवी मुंबई महापालिका मुख्यालयातच एसीबीचा सापळा; अधिकाऱ्याला 42 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गोड साखरेची कडू कहाणी ; साखरेच्या दरवाढीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर आक्रमक 
बातमी

गोड साखरेची कडू कहाणी ; साखरेच्या दरवाढीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर आक्रमक 

by mosami kewat
August 22, 2026
0

जनतेने लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर आंदोलन करण्याचे आवाहन औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता...

Read moreDetails
राम माधव यांच्या ISI अधिकाऱ्यांसोबतच्या भेटीवरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल; मोहन भागवतांकडे खुलाशाची मागणी

राम माधव यांच्या ISI अधिकाऱ्यांसोबतच्या भेटीवरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल; मोहन भागवतांकडे खुलाशाची मागणी

August 22, 2026
मनमाडमध्ये सार्वजनिक जागेवर खाजगी टर्फ उभारण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; उद्घाटनास विरोध करण्याचा इशारा

मनमाडमध्ये सार्वजनिक जागेवर खाजगी टर्फ उभारण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; उद्घाटनास विरोध करण्याचा इशारा

August 22, 2026
आदिवासी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयांवर कारवाई करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

आदिवासी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयांवर कारवाई करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

August 22, 2026
अखेर वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेनंतर यवतमाळ नगर परिषदेची माघार!

अखेर वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेनंतर यवतमाळ नगर परिषदेची माघार!

August 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home