Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; सेवली सर्कलसाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता नियुक्त

mosami kewat by mosami kewat
April 19, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; सेवली सर्कलसाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता नियुक्त
       
जालना : सेवली सर्कल अंतर्गत येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेतील घरकुलांचे रखडलेले हप्ते आणि अपूर्ण कामांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासनाने या सर्कलसाठी स्वतंत्र ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याची नियुक्ती केली आहे.

सेवली सर्कलमधील शेकडो लाभार्थ्यांची घरकुलांची कामे अंतिम टप्प्यात असताना, काही लाभार्थ्यांना पुढील हप्ते मिळणे बाकी होते. मात्र, तांत्रिक मूल्यमापन व प्रगती अहवालासाठी आवश्यक असलेला ग्रामीण गृहनिर्माण अभियंता उपलब्ध नसल्याने हप्ते वितरणात मोठा विलंब होत होता. परिणामी अनेकांची घरकुलांची कामे ठप्प झाली होती. (Housing Schemes)

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डाके यांनी ४ मार्च २०२६ रोजी पंचायत समिती, जालना येथे लेखी अर्ज देत अभियंता नियुक्त करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत गटविकास अधिकारी (BDO) यांनी दि. १६ मार्च २०२६ पासून श्री. हसीब मुजीब खाजा यांची सेवली सर्कलसाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणून नियुक्ती केली.

या नियुक्तीमुळे आता प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या कामांना गती मिळणार असून, प्रलंबित हप्ते लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Tags: Housing SchemesjalnaMaharashtraPMAYRamai Awas Gharkul YojanaShevliVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

शिरड शहापूर येथे २ तास ‘रास्ता रोको’ आंदोलन; भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Next Post

गुजरातमध्ये गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे 30 लाख मजूर परतले आपल्या गावी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारच्या कारभारावर संताप!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
“मनरेगा”च्या नव्या अवताराने “व्हीबी-रामजी”ने पहिल्याच महिन्यात रंग दाखवायला सुरुवात
अर्थ विषयक

“मनरेगा”च्या नव्या अवताराने “व्हीबी-रामजी”ने पहिल्याच महिन्यात रंग दाखवायला सुरुवात

by mosami kewat
August 20, 2026
0

- संजीव चांदोरकर  वीस वर्षांपासून अमलात असणाऱ्या ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) च्या जागी मोदी सरकारने “विकसित भारत ग्यारंटी फॉर...

Read moreDetails
माता रमाई आंबेडकर नगर वसतिगृहातील समस्यांवर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी

माता रमाई आंबेडकर नगर वसतिगृहातील समस्यांवर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी

August 20, 2026
अतिक्रमण कारवाईवरून शेवगावात राजकीय गदारोळ; नगर परिषदेच्या पक्षपाती कारवाईवर प्रा. किसन चव्हाण आक्रमक

अतिक्रमण कारवाईवरून शेवगावात राजकीय गदारोळ; नगर परिषदेच्या पक्षपाती कारवाईवर प्रा. किसन चव्हाण आक्रमक

August 20, 2026
बार्टीच्या पीएच.डी. अधिछात्रवृत्तीतील वयोमर्यादेचा प्रश्न वंचितने आणला ऐरणीवर; बार्टीच्या महासंचालकांच्या मान्यतेने शासनाला पत्र; संशोधक विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा

बार्टीच्या पीएच.डी. अधिछात्रवृत्तीतील वयोमर्यादेचा प्रश्न वंचितने आणला ऐरणीवर; बार्टीच्या महासंचालकांच्या मान्यतेने शासनाला पत्र; संशोधक विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा

August 19, 2026
कुर्ला एल विभागातील नागरी समस्यांवर स्वप्नील जवळगेकर यांची प्रभारी सहाय्यक आयुक्तांशी भेट

कुर्ला एल विभागातील नागरी समस्यांवर स्वप्नील जवळगेकर यांची प्रभारी सहाय्यक आयुक्तांशी भेट

August 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home