Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ नको; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

mosami kewat by mosami kewat
April 19, 2026
in बातमी, राजकीय, विज्ञान - तंत्रज्ञान, सामाजिक
0
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ नको; वंचित बहुजन आघाडी आक्रमक
       
रोजगाराच्या संधी कमी; लघुलेखक पदांवरून सरकारला घेराव

मुंबई : महाराष्ट्र सरकारने ‘लघुलेखक’ (स्टेनोग्राफर) संवर्गातील पदे ‘मृत’ घोषित केल्याच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले असून वंचित बहुजन आघाडीने या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला आहे. पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात कठोर भूमिका मांडण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो मेहनती विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गदा आली असून हा निर्णय पूर्णतः अन्यायकारक आहे. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा बळी देणारा हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

पक्षाने सरकारसमोर दोन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. त्यानुसार ‘लघुलेखक’ पदे तत्काळ कायम ठेवावीत आणि विद्यार्थ्यांच्या कष्टाचा व भवितव्याचा विचार करून हा निर्णय रद्द करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच, आधीच बेरोजगारीच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या राज्यातील तरुणांच्या रोजगाराच्या संधी कमी करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करत, अशा निर्णयांचे धाडस सरकारने करू नये, असा इशाराही वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

दरम्यान, या निर्णयावरून राज्यभरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: CourseEducationMaharashtraPoliticalStenographerStudents
Previous Post

‘अंतरीचे दीप’ ला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

Next Post

शिरड शहापूर येथे २ तास ‘रास्ता रोको’ आंदोलन; भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Next Post
शिरड शहापूर येथे २ तास ‘रास्ता रोको’ आंदोलन; भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

शिरड शहापूर येथे २ तास ‘रास्ता रोको’ आंदोलन; भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; सेवली सर्कलसाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता नियुक्त
बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; सेवली सर्कलसाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता नियुक्त

by mosami kewat
April 19, 2026
0

जालना : सेवली सर्कल अंतर्गत येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेतील घरकुलांचे रखडलेले हप्ते आणि अपूर्ण कामांचा प्रश्न...

Read moreDetails
शिरड शहापूर येथे २ तास ‘रास्ता रोको’ आंदोलन; भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

शिरड शहापूर येथे २ तास ‘रास्ता रोको’ आंदोलन; भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

April 19, 2026
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ नको; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ नको; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

April 19, 2026
‘अंतरीचे दीप’ ला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

‘अंतरीचे दीप’ ला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

April 19, 2026
कामगारांचा असंतोष आणि आर्थिक धोरणे: केवळ वेतनवाढ पुरेशी आहे का?

कामगारांचा असंतोष आणि आर्थिक धोरणे: केवळ वेतनवाढ पुरेशी आहे का?

April 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home