Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘अंतरीचे दीप’ ला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

Akash Shelar by Akash Shelar
April 19, 2026
in बातमी
0
‘अंतरीचे दीप’ ला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर
       

नांदेड : मराठी साहित्यात सामाजिक जाणीवा, परिवर्तनवादी दृष्टिकोन आणि मानवी मूल्यांची प्रभावी मांडणी करणाऱ्या ‘अंतरीचे दीप’ या सर्जनशील साहित्यसंग्रहास यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी, लातूर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर झाला आहे. हा साहित्यसंग्रह सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. माधव हैबतकर यांनी लिहिला आहे.

अकादमीचे सचिव प्रकाश घादगिने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अंतरीचे दीप’ हा दर्जेदार आणि विचारप्रवर्तक साहित्यसंग्रह असून पुरस्कार निवड समितीने सर्वानुमते त्याची निवड केली आहे. या साहित्यकृतीने समकालीन जीवन वास्तव प्रभावीपणे उभे करत वाचकांना नवी प्रेरणा दिल्याने साहित्य क्षेत्रात विशेष ओळख निर्माण केली आहे.

दरम्यान, येत्या २८ एप्रिल २०२६ रोजी लातूर येथे आयोजित अकादमीच्या दुसऱ्या साहित्य संमेलनात या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल आणि प्रशस्तीपत्र असे आहे.

या यशाबद्दल डॉ. माधव हैबतकर यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. अशोक सोनी, उपाध्यक्ष सतीश झरकर, सचिव ओमप्रकाश डागा, कोषाध्यक्ष डॉ. किशोर मंत्री, तसेच बी. रघुनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास सोनवणे, विविध साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वीही डॉ. माधव हैबतकर यांना साहित्य क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.


       
Tags: Antariche deepdr. madhav haibatkarlatur
Previous Post

कामगारांचा असंतोष आणि आर्थिक धोरणे: केवळ वेतनवाढ पुरेशी आहे का?

Next Post

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ नको; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Next Post
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ नको; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ नको; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी
बातमी

हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

by mosami kewat
September 7, 2026
0

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, याची पाहणी...

Read moreDetails
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

September 7, 2026
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

September 7, 2026
तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा 'Gen-Z' कनेक्ट

तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट

September 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home