Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home article

बौद्धेतर दलित आणि आंबेडकर चळवळ : दिशा आणि आव्हाने

mosami kewat by mosami kewat
April 14, 2026
in article, राजकीय, सामाजिक
0
बौद्धेतर दलित आणि आंबेडकर चळवळ : दिशा आणि आव्हाने
       

– कुलदीप कोटंबे

हिंदू विरुद्ध मुस्लिम, दलित विरुद्ध सवर्ण असे समाजामध्ये जे पूर्वीपासून असलेले संघर्ष आढळून यायचे त्यापेक्षा नवनवीन संघर्ष गेल्या दहा वर्षात देशामध्ये विशेषतः महाराष्ट्र मध्ये पाहयाला ला मिळत आहेत. भीमा कोरेगाव मध्ये मराठा विरुद्ध दलित हा संघर्ष , गेल्या निवडणुकांमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष, असे संघर्ष दिसले..पण सध्या महाराष्ट्रामध्ये जो एक वेगळा संघर्ष दिसत आहे आणि तो फार टोकाचा झालेला आहे तो म्हणजे बौद्ध विरुद्ध बौद्धतर दलित हा संघर्ष.

मराठवाड्यामध्ये झालेल्या नामांत आंदोलनाच्या वेळी एका दिलाने , एकसंध पणे असलेला संपूर्ण दलित समाज हा असा का विभागला.

आमच्या इन्स्टिट्यूट मध्ये येऊन काही बौद्धेतर मंडळी मला सांगत असतात की बौद्ध लोकांमुळेच आपली मुलं ही आयएएस आयपीएस बनत नाहीत. कारण त्यांना बुद्ध लोक पुढे येऊ देत नाहीत. मुलाखतीपर्यंत आपली मुलं पोहोचतात परंतु तिथे बौद्ध मंडळी आपल्या मुलांना पुढे जाऊ देत नाहीत. आता हा त्यांचा युक्तिवाद कुठून आला? त्याला काय लॉजिक आहे? त्यांना सांगता येत नाही. ज्या माणसांनी संघ लोकसेवा आयोगाची मुलाखत दिली आहे त्या सगळ्यांना हे माहीत असतं की इंटरव्यू पॅनल मध्ये सबंध भारतातून लोक आलेले असतात. तिथे काही फक्त महाराष्ट्रातील बौद्ध आणि बौद्धेतर दलित असे स्पर्धा नसते. परंतु हे लॉजिक किंवा अशा प्रकारचे मांडणी की बौद्ध मुळेच बौद्धेतर दलित पुढे जात नाहीत ही मांडणी पाच ते सहा वर्षांपासूनच होत आहे. अशी कुठलाही आधार नसलेली मांडणी बौद्धेतर दलित समाजातील काही संघटना आणि त्या संघटनेचे कार्यकर्ते तावातवाने करत आहेत. याला उत्तर म्हणून अर्थातच बौद्ध समाजातील कार्यकर्त्यांकडून त्याच तडफेने उत्तर दिलं जात आहे. बौद्धे तर दलित कसे देवाच्या मागे आहेत कसे देवांमध्ये गुरफटून  गेलेले आहेत… ते हिंदू धर्म कसा सोडू शकत नाहीत… अशा प्रकारचे नेहमी पासून चालत आलेली मांडणी ते करतात… पण बौद्धतर दलितांमध्ये आपला शत्रू म्हणजे बौद्ध समाज अशा प्रकारचे विशवल्ली कुठून आलेली आहे? आणि ही गेल्या दहा वर्षांमध्येच फार मोठ्या प्रमाणात वाढली. आता कुठल्याही प्रकारचा आधार नसलेली मांडणी जेव्हा येते तेव्हा त्या मागे कोण असतं. बौद्ध आणि बौद्धेतर दलितांना भांडण लावून कोण याचा फायदा घेत आहे हे सूर्यप्रकाशातले लक्ख आहे. 

बौद्धतर दलितातील अनेक तरुणांना हे काय चाललंय हे समजत आहे. हे तरुण मंडळी जमेल तशा पद्धतीने आपल्या समाजामध्ये आंबेडकरवाद जोपासत सुद्धा आहेत. परंतु नेमका वाद काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.

बौद्धेतर दलितावर फार पूर्वीपासून होत असलेला आरोप म्हणजे ते देवी देवता सोडण्यास तयार नाही. ते हिंदू धर्माची गुलामी सोडण्यास तयार नाहीत. किंवा बाबासाहेबांना आरक्षण दिलं परंतु ते बाबासाहेबांना मानत नाहीत. आता यामध्ये अर्थ सत्य आहे. बौद्धतर दलित मग तो कितीही वाया गेलेला असला किंवा तो अगदी दारू पिणारा बेवडा मनुष्य असला तरी सुद्धा तो बाबासाहेबांना मानतो. बाबासाहेबांचा आदर करतो.

उत्तर भारतामध्ये अनेक जाती समूह आहेत जे बाबासाहेबांना सर्व परी मानतात. महाराष्ट्रात मात्र बौद्ध वगळता बाबासाहेबांचे नाव कुणी घेत नाही. ओबीसी मधले फार थोडे अपवाद सोडले तर ओबीसी बांधव सुद्धा बाबासाहेबांचं नाव घेत नाहीत. घरात फोटो वगैरे लावून , हे फार दूर ची गोष्ट. महाराष्ट्र मध्ये बौद्धा खेरीज बाबासाहेबांचं नाव अभिमानाने घेणारा एकमेव समूह म्हणजे बौद्धेतर दलित. ते बौद्ध एवढे कट्टर नसतात किंवा ते चारचौघांसमोर किंवा घरामध्ये बाबासाहेबांचे फोटो लावत नाहीत. परंतु बाबासाहेब बद्दल त्यांच्या मनामध्ये अतोनात आदर असतो. हे सहज आपल्याला अनुभवता येतं. त्यांना सुद्धा बाबासाहेबांबद्दल प्रचंड अभिमान असतो. वादाची सुरुवात इथून होते की बौद्धतर दलित हिंदू देवी देवतांची पूजा करतात आणि ते बौद्ध समाजासारखं उघडपणे जयंती करत नाहीत. जयंती मध्ये फारसे सामील होत नाहीत. देवी-देवतांना सोडत नाहीत. कर्मकांड सोडत नाहीत याचाच बौद्ध समाजाला राग येतो आणि बौद्ध समाज तो वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त सुद्धा करतो.

ओबीसी बांधवांचा किंवा उच्च वर्णी यांचा बौद्ध समाजाला फारसा राग येत नाही. परंतु बौद्धतर दलित समाजाचा मात्र सात्विक संताप येतो. याचं कारण सुद्धा उघड आहे आणि ते न्यायपूर्ण सुद्धा आहे. ज्या समाजाने आपल्यासारखेच अस्पर्शतेचे चटके भोगले आणि ज्या समाजाला आज बाबासाहेबांमुळे मानवी अधिकार मिळालेले आहेत तो समाज बाबासाहेबांचं विचार का अमलात आणत नाही असं बौद्ध समाजाला वाटतं. सगळ्या जवळचे म्हणून सगळ्यात जास्त राग येतो. त्यांनी बौद्ध चळवळीत यावं आंबेडकरवादी चळवळीत यावं असं सुद्धा वाटतं .आणि त्यामुळेच बौद्ध समाज तीव्रपणे हे सांगत आलेला आहे की तुम्ही देवी देवता सोडा आणि आंबेडकर चळवळीत या.

पूर्वीपासूनच बौद्धतर दलित समाज हा बौद्ध समाजाला दूषण देतो की बौद्धांनी बाबासाहेब फक्त आपल्या पुरते सीमित करून ठेवले. त्यांनी बाबासाहेबांना इतर समाजाला स्वीकारूच दिले नाही .आम्हाला बाबासाहेबांचा आदर्श आहे परंतु बौद्ध मंडळी आम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही चळवळीत येत नाही. आम्ही या कार्यक्रमात येत नाही. फार पूर्वीपासूनच हा या दोन समाजातील वाद दिसतो. परंतु सध्या या संघर्षांना टोक गाठलेल आहे.

आम्हाला काही झालं तरी आंबेडकर चळवळीत यायचंच नाही. आमचं सगळं काही वाईट बौद्धांमुळे झालेला आहे असा एक नवीन मतप्रवाह तयार करण्यामध्ये उजव्या मंडळींना यश आलेलं आहे. याची तीव्र प्रतिक्रिया म्हणून तुम्हाला अमित चळवळीत घेणारच नाही तुमची लायकीच गुलामी करण्याची आहे अशा प्रतिक्रिया सुद्धा स्वतःला कडव्या समजल्या जाणाऱ्या बौद्ध कडून येत आहेत.

हा संघर्ष गेल्या दहा वर्षात दिसत असला तरी याची पायाभरणी अनेक वर्षापासून सुरू आहे. मराठवाड्यामध्ये विशेषता लातूर, नांदेड जिल्ह्यामध्ये संघांनी, हिंदुत्ववादी संघटनाने जमिनीवर प्रचंड कार्य केलेल आहे. बौद्धतर दलितांमध्ये घरोघरी जाऊन या लोकांनी त्यांना शाखेमध्ये वेगवेगळ्या उजव्या विचारसरणीच्या उपक्रमामध्ये गुंतवून घेतलं. त्यांच्या शालेय शिक्षण संस्था आहेत, त्यामध्ये बौद्धतर तर दलित मुलांना प्रवेश दिला. त्यांची लहानपणापासूनच हिंदुत्ववादी विचारसरणी तयार केली.

बौद्धेतर समाजाचे अशी हिंदुत्ववादी मानसिकता तयार करण्यामध्ये उजव्या संघटनांना का यश आलं ? मला माझ्या गावातील लहानपणच्या दोन घटना आठवतात. पहिली घटना म्हणजे बौद्धतर दलित समूहातील अनेक मंडळी ही वारकरी असतात. ते गावांमधील हरिनाम सप्ताह वगैरे कार्यक्रमांमध्ये भजन म्हणण्यास जातात. वारकरी संप्रदायांमध्ये जी बुक्का लावण्याची पद्धत आहे त्यामध्ये या दलित वारकऱ्यांना बुक्का लावला जात नाही. त्यांच्यापैकी एकाच्या हातावर तो बुक्का वरून टाकला जातो आणि मग ते अपसामध्ये तो बुक्का कपाळावर लावून घेतात .हे अगदी आज सुद्धा गावागावांमध्ये चालू असतो. आता आमच्या लहानपणी काही वारकरी मंडळींना याचा राग आला.

आपल्यासोबत अस्पृश्यता पाळली जाते याचा त्यांना वाईट वाटलं. आणि मग त्यांनी त्यांचा स्वतंत्र भजनी मंडळ तयार केलं. बौद्धेतर दलित मंडळी पैकी बरेच लोक नोकरीला होते त्यांनी या लोकांना भजनाचा सामान घेऊन दिलं.  दलित समाजमंदिर असतात तिथे हे लोक भजन करू लागले. काही दिवसांनी गावातील भांडण मिटली आणि हे लोक एकत्र भजन करू लागले. पुन्हा हातामध्ये बुक्का घेणे सुरूच आहे .सप्ताहामध्ये सगळ्यात शेवटी यांना जेवण्यासाठी बोलवलं जातं आणि ही मंडळी जातात.

दुसरा एक प्रसंग माझ्या लहानपणी घडलेला परंतु मला अगदी लक्ख आठवतो. गावामध्ये महादेवाचे मंदिराचे बांधकाम सुरू केलं यामध्ये गावांमधील लोकांकडून वर्गणी केली गेली. गावांमधील बौद्धतर दलितांमध्ये अनेक कर्मचारी लोक होते त्यामध्ये काही मोठ्या पदावर होते. त्यांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात वर्गणी घेण्यात आली. त्यांनी सुद्धा दानशूरपणे मोठ्या मोठ्या रकमा दिल्या. 

खरं म्हणजे बौद्ध शतर दलित मंडळीमुळेच गावातील हे मंदिर आकाराला आलं. जेव्हा मंदिरामध्ये मुतीॅ ची प्रतिष्ठापना झाली तेव्हा काशी मधून ब्राह्मण आणले गेले. त्यांनी यज्ञ केला आणि या यज्ञाच्या वेळी गावातील ज्या दानशूर लोकांनी मंदिराला देणगी दिली आहे त्यांचा सत्कार केला गेला. आता या सत्काराच्या वेळी बुद्धतर दलित मंडळींना सुद्धा बोलवण्यात आलं. आणि हे मोठ्या पदावर असलेली मंडळी आली परंतु त्यांना यज्ञाच्या मंडपामध्ये न देता त्यांना वरूनच नारळ फेकण्यात आले. या लोकांनी ते नारळ तशाच पद्धतीने झेलले. आणि ते घरी आले. त्यांच्यामधील काही जे मोठे अधिकारी होते त्यांच्या पत्नीने हा अपमान आवडला नाही .त्या खूप दुःखी मनाने निघून आल्या. नंतर त्यांनी शक्यतो मंदिराला देणगी दिली नाही.

आता या दोन्ही घटनाानंतर बौद्ध तर दलितांनी मंदिरात जाणं सोडलं का? देवाची पूजा करणे सोडलं का? याचे उत्तर नाही आहे .आता गावामध्ये बौद्ध समाज आहे तो अशा प्रकरणांमध्ये पडतच नाही. तो भजनाला जात नाही त्यामुळे तिथं अपमान करून घेण्याचा प्रश्न नाही. तो मंदिराला देणगीत देत नाही त्यामुळे तिथे सत्काराचा प्रश्न नाही. परंतु बौद्धतर दलित मात्र अशा अपमानामुळे दुःखी होतो परंतु त्यांनी हिंदुत्व, हिंदुधर्म कधीही सोडलं नाही आणि त्यामुळेच या समाजाला लक्ष करणं ,या समाजाचे दिशाभूल करून आपल्या स्वतःसाठी वापरून घेणं हे उजव्या संघटनांना सहज शक्य झालेलं आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये बौद्धतर दलिता समाजामध्ये जागृती होत होती मोठ्या शहरांमध्ये किंवा अगदी मराठवाड्यामध्ये सुद्धा बौद्ध तर डॉक्टर्स इंजिनियर्स हे उघडपणे आंबेडकरवाद स्वीकारत आहेत. अगदी या वर्षी सुद्धा लातूर जिल्ह्यामधील बौद्धतर समाजाची काही लग्न सत्यशोधक पद्धतीने होत आहेत. रणदिवे सारखे काही तरुण  आशादायक मांडणी करत आहेत.

या सगळ्याबरोबरच गेल्या दहा वर्षांमध्ये बौद्धतर दलितांमध्ये प्रतीगामी गट मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेली आहेत. आपल्या जाती अस्मिता मुद्दाम टोकदार करत आहेत  लहुजी साळवे, अण्णाभाऊ साठे असे प्रतीक घेऊन समाजामध्ये विभागणी करत आहेत. खरं म्हणजे या महापुरुषांना ते दलित एक्यामध्ये अडथळा करण्याचे साधन म्हणून वापरत आहेत. लहुजी साळवे आणि अण्णाभाऊ साठे यांचे खरे विचार ते बौद्धतर समाजापुढे जाऊ देत नाहीत. लहुजी साळवे हे किती सत्यशोधक चळवळीमध्ये अग्रेसर होते हे मुद्दाम बौद्धतर तरुणांना सांगत नाहीत. काही न शिकलेली बौद्धतर मंडळी सुपारी घेतल्यासारखे युट्युब वर अर्वाच शब्दांमध्ये पुरोगामी चळवळीला शिव्या घालत असतात. लहुजी साळवे यांना हिंदुत्वाची वजमुठ असं संबंबोधतात. त्यांचा प्रचंड अपमान करतात. यापेक्षा सगळ्यात मोठी दुःखाचे बाब म्हणजे काही सुशिक्षित मंडळी की ज्यांना सगळं माहीत असून सुद्धा ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी या अशा लोकांना साथ देतात. उजव्या संघटनांमध्ये सहभागी होतात.

त्यांच्या अपप्रचाराला अधिक मोठ्याने अधिक तीव्र स्वरूपात लोकांना सांगत फिरतात यामुळे आपल्या स्वतःच्या समाजाची किती अधोगती होत आहे यांचाही विचार करत नाहीत. कारण असे गट, अशी मंडळी प्रत्येक टप्प्यांमध्ये प्रत्येक काळामध्ये येत असते. बौद्धतर पुरोगामी लोकांना याची भीती वाटते की या लोकांच्या स्वार्थी वागण्यामुळे सबंध समाज हा बाबासाहेबांच्या अगोदर होता तशा परिस्थितीत जाईल काय? 

दलित ऐक्य होऊ न देन हा उजव्या संघटनांचा सगळ्यात मोठा डाव आहे. हे यशस्वी होऊ द्यायचं नसेल तर त्याची जबाबदारी आंबेडकरवादी बौद्धतर दलितावर आहे पण त्याचबरोबर सच्चा आंबेडकरवादी बौद्ध समाजावर सुद्धा आहे. या परिस्थितीमध्ये एकमेकांच्या चुका काढण्यापेक्षा किंवा बौद्धतर समाज ज्या अंधश्रद्धा गेल्या 75 वर्षात सोडू शकला नाही त्यावर सारखं बोलण्यापेक्षा फुले शाहू आंबेडकर त्यांच्यापर्यंत पोहोचवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. 

बौद्ध समाजांनी सुद्धा आपली सांगण्याची पद्धत बदलता आली तर बदलून पहावं. आणि सध्या आपलं आव्हान फार मोठा आहे .आपल्याला दलित ऐक्य साध्य करायचं असेल तर एकमेकांची दोष काढण्यापेक्षा विचारावर वैचारिक चळवळीवर काम करणं गरजेचं आहे. बौद्धतर विचारवंतांनी आंबेडकरावादी बौद्धेतर  दलितांनी आपल्या लोकांपर्यंत अधिकाधिक आंबेडकर वाद पोहोचवणे हेच यावरच उत्तर आहे. बौद्ध तरुणांनी सुद्धा सध्या जरा लक्षात घेतलं पाहिजे की  होते तर समाज अंधश्रद्धा सोडेल तेव्हा सोडेल सध्या या समाजापर्यंत फक्त बाबासाहेबांचे विचार पोहोचवणं महत्त्वाचे आहे. बाबासाहेबांच्या विचारात एवढी ताकद आहे की हा समाज सगळ्या अंधश्रद्धा ,सगळे कर्मकांड सोडून देईल अशा सकारात्मक विचारानेच दोन्ही समाजातील प्रगल्भ विचारवंतांनी काम केलं तर हा जो बौद्धेतर तश दलित आणि बौद्ध यांच्यामधील संघर्ष संपु सुद्धा शकतो.


       
Tags: Bhim jayantibuddhismBuddhistDr B R AmbedkarDr Babasaheb Ambedkar jayantiMaharashtraPolitical
Previous Post

भाजपचा जातीयवाद! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी वाहिली श्रद्धांजली; वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र निषेध

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बौद्धेतर दलित आणि आंबेडकर चळवळ : दिशा आणि आव्हाने
article

बौद्धेतर दलित आणि आंबेडकर चळवळ : दिशा आणि आव्हाने

by mosami kewat
April 14, 2026
0

- कुलदीप कोटंबे हिंदू विरुद्ध मुस्लिम, दलित विरुद्ध सवर्ण असे समाजामध्ये जे पूर्वीपासून असलेले संघर्ष आढळून यायचे त्यापेक्षा नवनवीन संघर्ष...

Read moreDetails
भाजपचा जातीयवाद! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी वाहिली श्रद्धांजली; वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र निषेध

भाजपचा जातीयवाद! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी वाहिली श्रद्धांजली; वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र निषेध

April 14, 2026
उलवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहीचा LED बोर्डला विरोध; वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपानंतर अखेर लावला बोर्ड!

उलवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहीचा LED बोर्डला विरोध; वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपानंतर अखेर लावला बोर्ड!

April 13, 2026
नाशिकमध्ये RSS कडून ‘भव्य महाआरती’चे आयोजन; वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

नाशिकमध्ये RSS कडून ‘भव्य महाआरती’चे आयोजन; वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

April 13, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे-पिंपरीत वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे-पिंपरीत वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

April 13, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home