Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अक्कलकोटमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून संयुक्त जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य व महाप्रसाद वाटप

mosami kewat by mosami kewat
April 15, 2026
in बातमी, सामाजिक, सांस्कृतिक
0
अक्कलकोटमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून संयुक्त जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य व महाप्रसाद वाटप
       
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी 100 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच उपस्थितांना महाप्रसादही देण्यात आला.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या, पेन आदी साहित्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये पोलीस उपअधीक्षक विलास यामावर, सहायक पोलीस निरीक्षक निलेश बागाव, आरोग्य सभापती अविनाश मडीखांबे, सचिन बनसोडे तसेच पत्रकार चेतन जाधव, मारुती बावडे, स्वामीराव गायकवाड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026)

शाहू-फुले-आंबेडकर सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप मडीखांबे यांच्या हस्तेही साहित्य वाटप करण्यात आले.

गेल्या पाच वर्षांपासून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या महामानवांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवले जात असून, साडी वाटप, पाणपोई, खाऊ वाटप आणि शैक्षणिक साहित्य वितरण अशा उपक्रमांद्वारे समाजोपयोगी कार्य करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांनी दिली. (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026)

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष विशाल ठोंबरे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ता रविराज पोटे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष साहिल कांबळे तसेच उत्सव समिती अध्यक्ष आकाश गावडे, उपाध्यक्ष महेश बनसोडे, प्रवीण ढाले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भीमनगर पंचकमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: akkalkotBhim jayanticelebrationConstitutionDr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026
Previous Post

बौद्धेतर दलित आणि आंबेडकर चळवळ : दिशा आणि आव्हाने

Next Post

चंद्रपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Next Post
चंद्रपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

चंद्रपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
लंडनमध्ये द्वेषाला स्थान नाही; अमेरिकेनंतर ब्रिटनमध्येही मोहन भागवतच्या दौऱ्याला विरोध; RSS वर बंदी घालण्याची मागणी
बातमी

लंडनमध्ये द्वेषाला स्थान नाही; अमेरिकेनंतर ब्रिटनमध्येही मोहन भागवतच्या दौऱ्याला विरोध; RSS वर बंदी घालण्याची मागणी

by mosami kewat
September 4, 2026
0

लंडन : अमेरिकेच्या दौऱ्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत सध्या ब्रिटन दौऱ्यावर असून, लंडनमधील त्यांच्या प्रस्तावित कार्यक्रमाला विविध...

Read moreDetails
नवी मुंबई: रबाळेतील साईबाबा नगरच्या समस्यांविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सहाय्यक आयुक्तांनी केली पाहणी

नवी मुंबई: रबाळेतील साईबाबा नगरच्या समस्यांविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सहाय्यक आयुक्तांनी केली पाहणी

September 4, 2026
गणेशोत्सव आणि पर्यावरणाची जपवणूक : अकोल्यात २० हजार चिमुकल्यांनी साकारल्या शाडूच्या गणेशमूर्ती; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती! 

गणेशोत्सव आणि पर्यावरणाची जपवणूक : अकोल्यात २० हजार चिमुकल्यांनी साकारल्या शाडूच्या गणेशमूर्ती; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती! 

September 4, 2026
NCMC स्मार्ट कार्डच्या सक्तीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सवलत कार्डची अट तात्काळ रद्द करण्याची मागणी

NCMC स्मार्ट कार्डच्या सक्तीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सवलत कार्डची अट तात्काळ रद्द करण्याची मागणी

September 4, 2026
रेल्वे उत्तर वार्डातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी प्रशासकीय बैठक; ८० टक्के प्रक्रिया पूर्ण

रेल्वे उत्तर वार्डातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी प्रशासकीय बैठक; ८० टक्के प्रक्रिया पूर्ण

September 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home