Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बार्टीच्या जाहिरातीवरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची महासंचालकांना नोटीस; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

mosami kewat by mosami kewat
April 13, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
बार्टीच्या जाहिरातीवरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची महासंचालकांना नोटीस; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

बार्टीच्या जाहिरातीवरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची महासंचालकांना नोटीस; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

PhD Fellowship : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी २०२३ च्या पीएचडी संशोधकांसाठीची फेलोशिप जाहिरात अद्याप प्रसिद्ध न केल्यामुळे, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (NCSC) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करत बार्टीच्या महासंचालकांना नोटीस बजावली असून ३० दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (PhD Fellowship)

सारथी आणि महाज्योती यांसारख्या इतर स्वायत्त संस्थांनी २०२३ च्या नोंदणीकृत विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर केली असताना, बार्टीने मात्र ३० ऑक्टोबर २०२३ च्या ‘समान निकष’ धोरणाचा चुकीचा आधार घेत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना या लाभापासून वंचित ठेवले आहे. हा संविधानातील कलम १४ (समानतेचा अधिकार) चा उघड भंग असून यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार आयोगाकडे करण्यात आली होती.

Also Read : नांदेडमध्ये वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संशोधक विद्यार्थी ऋषिकेश अशोक कांबळे यांच्या पुढाकाराने ही याचिका आयोगासमोर दाखल करण्यात आली होती. बार्टीने जाणीवपूर्वक जाहिरात रोखून धरल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते, ज्याची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. (PhD Fellowship)

Also Read : Kalyan-Nagar Highway Accident: कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

आयोगाचे संचालक डॉ. जी. सुनील कुमार बाबू यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, जर ३० दिवसांच्या आत समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर आयोग संविधानाने दिलेल्या दिवाणी न्यायालयाच्या अधिकारांचा वापर करून महासंचालकांना वैयक्तिकरित्या समन्स बजावून हजर राहण्याचे आदेश देईल.

विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या :

१. बार्टीने २०२३ ची फेलोशिप जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी.

२. पात्र सर्व (१००%) विद्यार्थ्यांना सरसकट अधिछात्रवृत्ती लागू करावी.

३. ‘समान निकष’ धोरणाची अंमलबजावणी करताना जुन्या बॅचच्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा.

या नोटीसमुळे आता राज्य सरकार आणि बार्टी प्रशासनावर २०२३ च्या विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा मार्ग मोकळा करण्यासाठी मोठा दबाव निर्माण झाला आहे.

Tags: Academic SupportAmbedkariteArticle 14BANRF Fellowship DelayBARTIConstitutionEducation JusticeEqual RightsHigher EducationNCSCPhD FellowshipPolicy FailurePrakash AmbedkarResearch ScholarsScheduled casteScholarshipIssuesSocial Justicestudent protestStudent Rightsvba
Previous Post

अमेरिकन निवडणुकांचे गणित आणि इराणचे निमित्त; ट्रम्प यांचा ‘डिफ्लेक्शन’ गेम!

Next Post

रिपब्लिकन सेनेला पुण्यात धक्का; पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

Next Post
रिपब्लिकन सेनेला पुण्यात धक्का; पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

रिपब्लिकन सेनेला पुण्यात धक्का; पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी जखमी : दोषींवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची सोलापूर जिल्हा परिषदेकडे मागणी
बातमी

शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी जखमी : दोषींवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची सोलापूर जिल्हा परिषदेकडे मागणी

by mosami kewat
August 12, 2026
0

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील मौजे बबलाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी...

Read moreDetails
२ दिवसांत बस सुरू करा; अन्यथा PMGSY कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन!

२ दिवसांत बस सुरू करा; अन्यथा PMGSY कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन!

August 12, 2026
भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका जाहीर: अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार सामने, बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता

भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका जाहीर: अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार सामने, बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता

August 12, 2026
घाटकोपरमध्ये टेकडी खचून चाळीवर कोसळली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली

घाटकोपरमध्ये टेकडी खचून चाळीवर कोसळली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली

August 12, 2026
युपीआय सशुल्क करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाकडे बघण्याचा दृष्टिकोन perspective अधिक महत्त्वाचा!

युपीआय सशुल्क करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाकडे बघण्याचा दृष्टिकोन perspective अधिक महत्त्वाचा!

August 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home