Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home article

अमेरिकन निवडणुकांचे गणित आणि इराणचे निमित्त; ट्रम्प यांचा ‘डिफ्लेक्शन’ गेम!

mosami kewat by mosami kewat
April 13, 2026
in article, अर्थ विषयक, राजकीय, सामाजिक
0
अमेरिकन निवडणुकांचे गणित आणि इराणचे निमित्त; ट्रम्प यांचा ‘डिफ्लेक्शन’ गेम!

अमेरिकन निवडणुकांचे गणित आणि इराणचे निमित्त; ट्रम्प यांचा ‘डिफ्लेक्शन’ गेम!

– संजीव चांदोरकर

आंतरराष्ट्रीय अर्थकारण / राजकारणात “कच्चा लिंबू” देखील नसणाऱ्या पाकिस्तानची निवड हेतूतः केली गेली होती.

अमेरिकेतील सहा महिन्यानंतर होऊ घातलेल्या मध्यावधी निवडणुका, त्यात होऊ शकणारी रिपब्लिकन पक्षाची पीछेहाट, ट्रम्प यांचे impeachment करण्याची वाढती मागणी, स्वतःच्या “मागा” पाठीराख्यामधून होऊ लागलेली टोकाची टीका, लाखो नागरिक रस्त्यावर उतरणे, आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेली टीका, अनेक दोस्त राष्ट्रांनी युध्दात सहभागी होण्यास दिलेला नकार…..

या सगळ्याला डिफ्लेक्ट करण्यासाठी ट्रम्प यांनी दोन आठवड्याची शस्त्रसंधी आणि इराण बरोबर वाटाघाटी करण्यास तयार असल्याचे जाहीर केले होते.

एकपात्री प्रयोग तर ट्रम्प गेले पंधरा महिने करतच आहेत. पण त्यांच्या समोरील गर्दी वेगाने ओसरू लागली होती. लोक अंडी, टोमॅटो फेकू लागले होते. वेगळे नाटक करण्याचे दडपण त्यांच्यावर होते.

ट्रम्प यांना इराणने वाटाघाटींच्या टेबलवर येण्यास फक्त मान्यता द्यावी एवढेच हवे होते. बाकी काही नाही. इराण टेबलावर आला नसता तर नाटक पुढे गेलेच नसते. इराणने यावे यासाठी इराणने सुचवलेल्या दहा कलमी अजेंड्यावर काम करता येईल असे ट्रम्प यांनी नेहमीप्रमाणे “ठोकून” दिले.

इराणचे प्रतिनिधी मंडळ हजर झाले आणि “इस्लामाबाद टॉक्स” चा एकमेव आणि अंतिम हेतू तेव्हाच साध्य झाला होता. एकवीस तास वाटाघाटीचे नाटक करून अमेरिकन प्रतिनिधी मंडळ मायदेशी परतले. सारा ठपका अपेक्षेप्रमाणे इराणवर ठेवून…

पाकिस्तान वाटाघाटींसाठी यजमान म्हटल्यावर इस्रायल टेबलावर नसणार हे त्याचवेळी स्पष्ट होते. त्यामुळं इस्रायलला आपला अजेंडा रेटण्यास, विशेषतः लेबनॉन वरील हल्ले सुरू ठेवण्यास मोकळीक मिळणार होती.

ट्रम्प आणि नेत्यांनाहू यांच्यातील डीलचा तो गाभा आहे. सोयीचे असेल तेव्हा एकत्र. नसेल त्यावेळी वेगवेगळे.

खरेतर अशा टोकाच्या तणावपूर्ण परिस्थितीत कोणीतरी तगडा मध्यस्थ पाहिजे होता. जो दोन्ही पक्षांचे कान धरू शकेल. वाटाघाटी फिस्कटल्या तर खरेतर मध्यस्थाची देखील नाचक्की होत असते. त्यामुळे कितीही दिवस लागले तरी कोणत्याही पक्षाला टेबलावरून उठू न देणे, एक फेरी झाली तर दुसऱ्या फेरीसाठी कालबद्ध तारखाना पक्षांना कमिट करून घेणे हे मध्यस्थाकडून अपेक्षित असते.

पाकिस्तान दोन्ही पक्षांपैकी कोणावरही दडपण आणण्याच्या ताकदीचा कधीच नव्हता. अमेरिकेवर तर नाहीच नाही. पाकिस्तान नाचक्की वगैरेच्या पलीकडे होता आणि आहे देखील. पाकिस्तानचे नेते, लष्कर प्रमुख यांचे राजनैतिक कौशल्य वगैरे मिडिया मधील स्टोरीज होत्या.

ट्रम्पना प्रेशर कुकरची शिट्टी उचलून, असह्य होत असलेली वाफ कमी करायची होती. पुन्हा युद्ध सुरू करण्यास हात मोकळे ठेवायचे होते. पाकिस्तान त्यांच्या गेम मध्ये फिट बसत होता.

Tags: Diplomatic Gamedonald trampGeo politicsGlobal PoliticsGlobal Power PoliticsInternational RelationsIran TalksIsrael IranMiddle East CrisisPakistan DiplomacyPolitical AnalysisPower PoliticsTrump StrategyWar And Peace
Previous Post

Kalyan-Nagar Highway Accident: कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Next Post

बार्टीच्या जाहिरातीवरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची महासंचालकांना नोटीस; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे
Uncategorized

दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे

by mosami kewat
September 1, 2026
0

मुंबई : एसआयआर प्रक्रियेत महाराष्ट्रातील दोन कोटींपेक्षा अधिक मतदारांची नावे मसुदा मतदार यादीतून बाहेर केल्याची बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक...

Read moreDetails
अंतर्गत वाद आणि जाचाला कंटाळून फलटणच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची मुंबईत आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

अंतर्गत वाद आणि जाचाला कंटाळून फलटणच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची मुंबईत आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

September 1, 2026
भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

भारतीय स्वातंत्र्याचा सूर्य अन् भटक्यांच्या पालावरचा अंधार

September 1, 2026
भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

September 1, 2026
विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट

विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट

September 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home