Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आरएसएस मुख्यालयावर विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा 

mosami kewat by mosami kewat
March 24, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
आरएसएस मुख्यालयावर विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा 
       

नागपूर : वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस पार्टी, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी आणि इतर समविचारी पक्षांच्या वतीने नागपूर येथे आरएसएसच्या मुख्यालयावर “विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चा” काढण्यात आला. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव एपस्टीन फाईलमध्ये आले असून, अमेरिकेसोबत केलेल्या देशविरोधी व्यापार करारांमुळे देशाची सार्वभौमता अमेरिकेसमोर गहाण ठेवण्यात आली आहे. (Mass Protest March at RSS Headquarters)

अमेरिकेसोबत करण्यात आलेल्या करारांचा परिणाम शेतकरी, भारतीय उत्पादने, मजूर वर्ग आणि देशाच्या सार्वभौमत्वावर होत असल्याचे सांगत, ही लढाई तालुका आणि जिल्हा स्तरावर नेऊन जनजागृती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

तसेच, आरएसएसनेच नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवले असून, ते ब्लॅकमेल होऊन देशविरोधी निर्णय घेत आहेत, असा आरोप करत “स्वतःला देशभक्त म्हणवणारा आरएसएस यावर मौन का बाळगतो?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मोदी यांना पंतप्रधानपदी कायम का ठेवले आहे, याचे स्पष्टीकरण आरएसएसने द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. (Mass Protest March at RSS Headquarters)

दरम्यान, मोर्चेकऱ्यांनी आरएसएस मुख्यालयाकडे शांततेत जाण्याचा प्रयत्न केला असता, पोलिस प्रशासनाने मोर्चा मधेच अडवला.

या मोर्चात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि इतर पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: bjpEpstein fileMaharashtraMohan Bhagwatnarendra modiPoliticalPrakash AmbedkarrssVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

बार असोसिएशन निवडणुकीत ॲड. प्रकाश आंबेडकरांनी बजावला मताचा हक्क

Next Post

टुकार भोसले ची राजकीय भोंदूगिरी…

Next Post
टुकार भोसले ची राजकीय भोंदूगिरी…

टुकार भोसले ची राजकीय भोंदूगिरी…

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘मुसलमानों का सियासी अजेंडा’ पुस्तकाचे प्रकाशन; मुस्लिम राजकारणावर मांडली रोखठोक मते
बातमी

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘मुसलमानों का सियासी अजेंडा’ पुस्तकाचे प्रकाशन; मुस्लिम राजकारणावर मांडली रोखठोक मते

by mosami kewat
May 9, 2026
0

मुंबई: प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस प्रकाशित आणि फारुख अहमद लिखित मुसलमानों का सियासी अजेंडा या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन वंचित बहुजन...

Read moreDetails
ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; ॲड. प्रकाश आंबेडकर

ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; ॲड. प्रकाश आंबेडकर

May 8, 2026
वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांवर अन्याय? नवीन सेवा प्रवेश नियमांविरोधात तीव्र संताप

वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांवर अन्याय? नवीन सेवा प्रवेश नियमांविरोधात तीव्र संताप

May 7, 2026
तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी TVK ने साधला विविध राजकीय पक्षांशी संवाद 

तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी TVK ने साधला विविध राजकीय पक्षांशी संवाद 

May 7, 2026
अकोल्यातील वंचितच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्णा शिरसाट यांचे निधन; अंजलीताई आंबेडकरांकडून भावूक श्रद्धांजली

अकोल्यातील वंचितच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्णा शिरसाट यांचे निधन; अंजलीताई आंबेडकरांकडून भावूक श्रद्धांजली

May 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home