Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मध्य-पूर्व संघर्षाचा भारतीय जहाजांवर परिणाम; अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्याची व्यवस्था करावी – ॲड. प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
March 14, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मध्य-पूर्व संघर्षाचा भारतीय जहाजांवर परिणाम; अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्याची व्यवस्था करावी – ॲड. प्रकाश आंबेडकर
       
औरंगाबाद : मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय समुद्री मार्गांवर सुमारे 140 भारतीय जहाजे अडकून पडल्याची माहिती समोर येत आहे. या जहाजांवर काही भारतीय नागरिकही अडकले असण्याची शक्यता असून त्यांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये, यासाठी भारत सरकारने तातडीने विशेष हवाई किंवा समुद्री वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मध्य-पूर्वेतील संघर्षामुळे काही जहाजांना परत येण्यासाठी सुरक्षित मार्ग मिळत नसल्याची माहिती मिळत असून अनेक जहाजे समुद्रातच थांबलेली आहेत, असे त्यांनी सांगितले. सुरुवातीच्या माहितीनुसार या जहाजांवर भारतीय नागरिकही अडकलेले असू शकतात आणि ही संख्या पुढे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या भागातील भारतीय दूतावासांनी अधिक सक्रिय भूमिका घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Prakash Ambedkar)

इराक, इजरायल, अमेरिका आणि ईराण या देशांशी संबंधित तणावपूर्ण परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांनाही मदत करणे कठीण जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भारत सरकारने अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी तातडीने विशेष व्यवस्था करावी, अशी मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

युद्ध सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजरायलचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात नेमकी काय चर्चा झाली, याबाबतही देशासमोर स्पष्टता असणे आवश्यक असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. (Prakash Ambedkar)

मध्य-पूर्वेतील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक काम करत असून भारताची परराष्ट्र नीती धार्मिक दृष्टीकोनातून नव्हे तर संतुलित आणि व्यावहारिक पद्धतीने राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

युद्ध दीर्घकाळ चालल्यास त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्था आणि बँकिंग क्षेत्रावरही होऊ शकतो, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. तणावपूर्ण परिस्थितीत आर्थिक व्यवस्थेवर दबाव वाढू शकतो, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत असल्याचेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. (Prakash Ambedkar)

सध्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे समुद्रातील जहाजांची लोकेशन ट्रॅक करणे शक्य आहे. त्यामुळे अडकलेल्या जहाजांची अचूक माहिती मिळवून त्यांच्याशी संपर्क ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

जग सध्या तणाव आणि अनिश्चिततेच्या टप्प्यातून जात असल्याने सर्व देशांनी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी एकत्रितपणे काम करून नागरिकांची सुरक्षा आणि जागतिक शांतता टिकवण्यावर भर द्यावा, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. (Prakash Ambedkar)

Tags: americademocracyDonald TrumpEpstein fileFuelMaharashtranarendra modioilPoliticalPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

औरंगाबाद : प्राध्यापक भरती अर्जासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मागणीला यश

Next Post

Somnath Suryawanshi Case: कोठडीतील मृत्यू प्रकरणी कायद्यात स्पष्टता हवी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा खंडपीठात जोरदार युक्तिवाद

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 
बातमी

आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 

by mosami kewat
August 25, 2026
0

सुजात आंबेडकरांनी घेतली आंदोलक विद्यार्थ्यांची भेट! पुणे : "आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, तर ते शांत बसणार नाहीत. सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांचा...

Read moreDetails
अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

August 25, 2026
Breaking News :  पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

Breaking News : पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

August 25, 2026
धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

August 25, 2026
मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

August 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home