Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘मोदी हटाव, देश बचाव’; एपस्टीन फाइल्स आणि व्यापार धोरणावरून वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत ‘महाआंदोलन’

mosami kewat by mosami kewat
March 2, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
‘मोदी हटाव, देश बचाव’; एपस्टीन फाइल्स आणि व्यापार धोरणावरून वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत ‘महाआंदोलन’
       
मुंबई: एपस्टीन फाईल्स प्रकरण आणि अमेरिकेशी सुरू असलेल्या एकतर्फी व्यापार धोरणावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाचे पडसाद आता रस्त्यावर उमटू लागले असून, आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘महाआंदोलन’ छेडण्यात आले आहे. “मोदी हटाव, देश बचाव” अशी घोषणा देत कार्यकर्ते आक्रमक झाले असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

एपस्टीन फाईल्समध्ये पंतप्रधान मोदींचा उल्लेख असल्याच्या बातम्यांवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.

अमेरिकेशी सुरू असलेल्या व्यापार करारांमुळे देशाचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या गंभीर मुद्द्यांवर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. थोड्याच वेळात बाळासाहेब आंबेडकर आंदोलनस्थळी दाखल होणार असून, ते कार्यकर्त्यांना संबोधित करतील. त्यांच्या आगमनापूर्वीच CSMT परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.

Tags: bjpMaharashtraMumbai protestnarendra modiPoliticalPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

Mumbai Pollution : मुंबईत पुन्हा वाढता प्रदूषणाचा धोका; पवईत सर्वाधिक एक्यूआय

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एपस्टिनचे संबंध होते; जनतेने, मीडियाने सरकारला याचा जाब विचारावा – सुजात आंबेडकर 

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एपस्टिनचे संबंध होते; जनतेने, मीडियाने सरकारला याचा जाब विचारावा – सुजात आंबेडकर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एपस्टिनचे संबंध होते; जनतेने, मीडियाने सरकारला याचा जाब विचारावा - सुजात आंबेडकर 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नगरसेवक शेख बिलाल यांचे निवेदन: बजेट बैठकीपूर्वी ऑडिटचा पेच, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
बातमी

नगरसेवक शेख बिलाल यांचे निवेदन: बजेट बैठकीपूर्वी ऑडिटचा पेच, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

by mosami kewat
April 30, 2026
0

Budget 2026 : नांदेड महानगरपालिकेच्या होणाऱ्या अर्थसंकल्प बैठकीपूर्वी मनपाच्या आर्थिक पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सन 2022 ते 2025...

Read moreDetails
हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास

हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास

April 28, 2026
मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचला भाऊ; १९,३०० रुपयांसाठी व्यवस्थेविरुद्ध आदिवासीचा मूक आक्रोश

मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचला भाऊ; १९,३०० रुपयांसाठी व्यवस्थेविरुद्ध आदिवासीचा मूक आक्रोश

April 28, 2026
टाकळी प्रदे येथील घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा; आमदार मंगेश चव्हाणांची दडपशाही !

टाकळी प्रदे येथील घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा; आमदार मंगेश चव्हाणांची दडपशाही !

April 28, 2026
रयतेच्या राजाची बदनामी कराल, तर याद राखा !

रयतेच्या राजाची बदनामी कराल, तर याद राखा !

April 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home