Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

चाकणमध्ये पीएमपीच्या इलेक्ट्रिक बसला आग; प्रसंगावधान राखल्याने ५० प्रवासी सुरक्षित

mosami kewat by mosami kewat
February 13, 2026
in बातमी, सामाजिक
0
चाकणमध्ये पीएमपीच्या इलेक्ट्रिक बसला आग; प्रसंगावधान राखल्याने ५० प्रवासी सुरक्षित
       
चाकण : पुण्याजवळील चाकण औद्योगिक वसाहतीत शुक्रवारी सकाळी एका धावत्या PMPML इलेक्ट्रिक बसला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. बसचालक आणि वाहक यांच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सुमारे ५० प्रवासी सुखरूप बचावले असून, मोठी जीवितहानी टळली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस चाकण औद्योगिक वसाहतीतील कामगारांना घेऊन आपल्या मार्गावरून जात होती. सकाळी बस प्रवाशांनी पूर्ण भरलेली असताना अचानक बसच्या मागील बाजूने धूर येऊ लागला. काही कळण्याच्या आतच धुराचे लोट वाढले आणि बसने पेट घेतला. बसमध्ये धूर दिसताच चालकाने क्षणाचाही विलंब न लावता बस रस्त्याच्या कडेला थांबवली. वाहकाने तातडीने सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यास सुरुवात केली. बसमधील सर्व ५० प्रवासी सुरक्षितपणे खाली उतरल्यानंतर काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाली. (Pune news)

घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेमुळे चाकण परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे. विशेष म्हणजे, सार्वजनिक बसना आग लागण्याच्या घटना आता अपवाद न राहता सातत्याने घडत आहेत, ज्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. (Pune news)

या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, प्रशासन याकडे गांभीर्याने का पाहत नाही? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. यावर प्रशासनाने त्वरित ठोस पावले उचलून बसची देखभाल आणि तांत्रिक तपासणी कडक करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.facebook.com/share/r/15XPTvKyTvv/

Tags: busChakan MIDCfireMaharashtraPMPML Bus firepunePune News
Previous Post

लोकसेवा विकास आघाडीच्या गटनेतेपदी अफसर खान यांची निवड

Next Post

कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिककर त्रस्त; वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे पोलीस आयुक्तांना निवेदन!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; दोन जण जखमी
बातमी

Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; दोन जण जखमी

by mosami kewat
October 18, 2026
0

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुहू येथील पुष्पा पार्क परिसरात ही...

Read moreDetails
साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्तक्षेपानंतर सुटका

साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्तक्षेपानंतर सुटका

October 18, 2026
आझाद समाज पार्टीला नाशिकमध्ये खिंडार! जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे संपूर्ण संघटनेसह वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर!

आझाद समाज पार्टीला नाशिकमध्ये खिंडार! जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे संपूर्ण संघटनेसह वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर!

October 18, 2026
ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात!  ट्रकच्या धडकेत १४ भाविक ठार, २९ जण जखमी

ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात!  ट्रकच्या धडकेत १४ भाविक ठार, २९ जण जखमी

October 18, 2026
कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर

कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर

October 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home