Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिककर त्रस्त; वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे पोलीस आयुक्तांना निवेदन!

mosami kewat by mosami kewat
February 13, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिककर त्रस्त; वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे पोलीस आयुक्तांना निवेदन!
       
नाशिक : नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकासकामांनी वेग घेतला असला, तरी नियोजनाच्या अभावामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. विशेषतः द्वारका चौफुली येथील कामामुळे वळवण्यात आलेल्या वाहतुकीचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी, नाशिक महानगरच्या वतीने आज (दि. १३) पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. (Nashik news)

यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे महानगर प्रमुख दिपक अर्जुन पगारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली. शहरात सध्या सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत, मात्र यामुळे अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा प्रचंड ताण येत आहे. द्वारका चौफुली बंद असल्याने अवजड वाहतूक इतर रस्त्यांनी वळवण्यात आली आहे, परंतु त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांचे पुरेसे बळ नसल्याने तासनतास वाहतूक कोंडी होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. (Nashik news)

निवेदनातील प्रमुख मागण्या:

– मुख्य चौक आणि पर्यायी मार्गांवर तात्काळ अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करावा.

– वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात.

– रुग्णवाहिका आणि शालेय बसना प्राधान्याने रस्ता मिळेल, याची खात्री करावी.

यावेळी बोलताना दिपक पगारे म्हणाले की, कुंभमेळ्याची कामे शहरासाठी महत्त्वाची असली तरी, सामान्य नाशिककरांचा छळ होता कामा नये. जर येत्या काही दिवसांत वाहतूक पोलिसांनी ठोस पावले उचलली नाहीत आणि कोंडी सुटली नाही, तर वंचित बहुजन युवा आघाडी जनहितासाठी तीव्र आंदोलन छेडेल. (Nashik news)

या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी युवराज मनेरे (महासचिव), विजय गायकवाड (संघटक), शिशुपाल गव‌ई (सचिव), सनीजी जाधव, नाना तपासे (उपाध्यक्ष), मनोज उबाळे (उपाध्यक्ष), ज्ञानेश्वर वाव्हळे (संघटक), राहुल नेटावटे (सचिव) सागर जाधव, आदित्य भालेराव, अमोल तूपलोंढे आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: developmentMaharashtraNashik newsPoliticalpoliticsRoad trafficVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

चाकणमध्ये पीएमपीच्या इलेक्ट्रिक बसला आग; प्रसंगावधान राखल्याने ५० प्रवासी सुरक्षित

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी कॉम्प्राईज्ड झाले आहेत का? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे देशव्यापी आंदोलनासाठी काँग्रेस नेतृत्वाला पत्र!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक
बातमी

‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक

by mosami kewat
September 27, 2026
0

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने उद्या, सोमवारी २८...

Read moreDetails
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी CBI चौकशीची मागणी

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी CBI चौकशीची मागणी

September 27, 2026
केंद्रीय निवडणूक आयोग भारत सरकारचा निवडणूक आयोग झालाय का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगावर निशाणा!

केंद्रीय निवडणूक आयोग भारत सरकारचा निवडणूक आयोग झालाय का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगावर निशाणा!

September 27, 2026
या सगळ्या विश्लेषणात आपले “मायबाप” सरकार कोठे आहे ? 

या सगळ्या विश्लेषणात आपले “मायबाप” सरकार कोठे आहे ? 

September 27, 2026
दुष्काळाचा शासन निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर टाकलेला किरकोळ कागदी मलम – राजेंद्र पातोडे

दुष्काळाचा शासन निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर टाकलेला किरकोळ कागदी मलम – राजेंद्र पातोडे

September 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home