Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home अर्थ विषयक

२७०० मिलिनिअर्स रोज, मग गरिबांच्या वाट्याला काय?

mosami kewat by mosami kewat
July 15, 2026
in अर्थ विषयक, राजकीय, सामाजिक
0
२७०० मिलिनिअर्स रोज, मग गरिबांच्या वाट्याला काय?
       

– संजीव चांदोरकर 

ही पोस्ट जगातील अत्यल्प संख्य असणाऱ्या श्रीमंताबद्दल नाहीये ; तर जगातील बहुसंख्य असणाऱ्या शेकडो कोटी ग्रामीण / शहरी गरीब / निम्न मध्यमवर्गीय नागरिकांबद्दल आहे !

२०२५ सालात जगात दररोज २७०० व्यक्ती डॉलर मिलियनोयर बनल्या, म्हणजे त्यांची संपत्ती ९ ते १० कोटी पेक्षा जास्त झाली. दररोज २७०० ! 

युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंड (आता ती फक्त यू बी एस म्हणून ओळखली जाते) दरवर्षी “ग्लोबल वेल्थ रिपोर्ट” प्रसिद्ध करते. २०२५ सालासाठी हा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. 

या अहवालात जगातील प्रत्येक देशातील व्यक्तींकडे किती संपत्ती संचय होत आहे याची आकडेवारी दिलेली असते. 

२०२५ अखेरीस जगातील एकूण संपत्ती ६०० ट्रिलियन डॉलर्स एवढी होती. त्या वर्षात मागच्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के वाढ झाली आहे. 

एक ट्रिलियन डॉलर्स म्हणजे एक लाख कोटी डॉलर्स ; म्हणजे ९० लाख कोटी रुपये  गुणिले ६०० ! कागदावर लिहा आणि शून्ये मोजा …भोवळ येऊं शकते. 

ही संपत्ती प्रामुख्याने दोन प्रकारच्या मत्तांमध्ये साठवलेली आहे. वित्तीय मत्ता / financial assets आणि जमीन/ घरे/ रिअल इस्टेट. 

दरवर्षी जगात डॉलर millionaire वाढत आहेत. म्हणजे दशलक्ष डॉलर्स पेक्षा जास्त संपत्ती असणारे. म्हणजे ९ ते १० कोटी रुपयांची संपत्ती असणारे. २०२५ मध्ये १० लाख व्यक्ती पहिल्यांदा मिलिनॉयर बनल्या. म्हणजे दिवसाला २७०० व्यक्ती. दिवसाला! 

दरवर्षी डॉलर बिलियनॉयर वाढत आहेत. बिलियन म्हणजे १०० कोटी. म्हणजे ९००० कोटी रुपयांपेक्षा जास्त संचित संपत्ती असणारे. २०२५ मध्ये ३३०० व्यक्ती बिलियनॉयर बनल्या..

 राजकीय आर्थिक दृष्टिकोनातून याचे अन्वयार्थ कसे लावता येतील. 

१ जगातील संपत्तीचे मूठभर व्यक्तींच्या कडील केंद्रीकरण आणि बहुसंख्य जनतेची वाढणारी गरिबी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे या काही सुरस आणि चमत्कारिक कथा नाहीत. त्या जगातील शकेडो कोटी गरीब/ सामान्य नागरिकांबद्दल आहेत 

२.  वित्तीय मत्तांमध्ये शेयर्स / रोखे इत्यादी मोडतात. शेयर्सचे भाव त्या कंपनीचा नफ्याने प्रभावित होतात. नफा काही हवेतून उदी काढतात तसा निर्वात पोकळीतून काढला जात नाही. जास्त नफा म्हणजे मानवी श्रमांचे जास्त शोषण. रोख्यांवर कमावले जाणारे व्याज पुन्हा उत्पादन खर्चातून, म्हणजे वस्तुमालाच्या किमतीतून वसूल केले जाते किंवा सार्वजनिक स्रोतातून. म्हणजे अंतिमतः श्रम विकणारे श्रमिक किंवा वस्तुमाल / सेवा विकत घेणारे ग्राहक नागरिक श्रीमंतांना श्रीमंत करत असतात..

३.  जागतिकीकरणामुळे अनेक मोठ्या कंपन्या बहुराष्ट्रीय झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रवर्तकांकडे / शेयर होल्डर्सकडे जमा  होणाऱ्या संपत्तीत, दुसऱ्या , अगदी गरीब / विकसनशील देशातील ता कंपन्यांमधून मिळवलेला नफा देखील भर घालत असतो. उदा मेटा कंपनीच्या मार्क झुकेरबर्ग याच्या संपत्ती वाढीत त्या कंपनीचा सतत वाढणारा भारतातील धंदा योगदान देत असतो 

४ आय / इन्कम आणि संपत्ती / वेल्थ या दोन भिन्न असल्या तरी त्या जैवपणे गुंफलेल्या आहेत. अधिक आय / इन्कम असणाऱ्या व्यक्ती त्यांच्या बचतीतून संपत्ती वाढवतात. तर संपत्ती मधून आय वाढते उदा डिव्हिडंड , भांडवली नफा , जमीन / रियल इस्टेटीचे भाडे इतयादी  

५ याच व्यक्ती अगदी लोकशाही प्रणाली असणाऱ्या देशात निवडणुका प्रभावित करतात , कोण निवडून येणार , कोण सत्तेवर येणार हे निर्णयाकरित्या ठरवतात. आणि राजकीय स्टेजवर विंगेत उभ्या असतात , वेळ येईल त्यावेळी स्वतःच सत्ताधीश बनतात. उदा डोनाल्ड ट्रम्प स्वतः अब्जाधिज आहेत आणि त्यांच्या मंत्रिमंडळात १० जण बिलियनर्स आहेत. भारत दूर नसेल. 

वरील आकडेवारी जरी जागतिक असली तरी जागतिक अर्थव्यवस्था कशी मूठभर श्रीमंताना अधिक श्रीमंत करत आहे ही अंतर्दृष्टी मिळवण्यासाठी उपयोगी आहे. ती अंतर्दृष्टी भारतासाठी एक्सट्रापोलेट करता येईल. भारताच्या अर्थव्यवस्थेत हेच अधिक उघड्या नागड्या पद्धतीने सुरु आहे. 

दिसण्यासाठी फक्त आपले डोळे उघडे हवेत , बौद्धिक प्रामाणिकपणा हवा आणि स्वातंत्र्यनंतर ८० वर्षानंतर देखील साधे मानवी राहणीमान न मिळू शकणाऱ्या कोट्यवधी गरिबांबद्दल हृदयात ओलावा हवा. त्यासाठी अर्थशास्त्राची पुस्तके वाचण्याची गरज नाही 

प्रॉब्लेम मध्यम वर्गाचा आहे. वन किंवा टू बीएचके आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक असली की त्यांना वाटते की ही टीका त्यांच्यावर आहे. मग ते खऱ्या श्रीमंतांचे फूट सोल्जर्स बनतात. भारतात याची संख्या खूप मोठी आहे. त्यांनी आपली मुळे आठवून गरीब निम्न मध्यमवर्गीय जनतेबरोबर उभे राहिले पाहिजे. तसे झाले तर देशाचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय फॅब्रिक बदलू लागेल. 

व्यवस्था बदल करू पाहणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांसाठी: फक्त आकडे बघा. ते सतत exponentially वाढणारे आहेत. म्हणजे सिस्टिमचा सारा गेम लक्षात येईल. Appropriation of Surplus. जात, धर्म, वंश, लिंग हे प्रश्न वेगळे नाहीत. त्या प्रश्नांची मांडणी या गेमच्या अनुषंगाने करण्याचे आव्हान आहे. 

भारताबद्दलची वेगळी पोस्ट लवकरच


       
Tags: EconomicsIndian Economypoor
Previous Post

हिप्परगा थडीत वंचित बहुजन आघाडीचा वाढता जनाधार! 

Next Post

ठाण्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल खाडीत वाहून गेला; वंचित बहुजन आघाडीचे सरकारला सवाल

Next Post
ठाण्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल खाडीत वाहून गेला; वंचित बहुजन आघाडीचे सरकारला सवाल

ठाण्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल खाडीत वाहून गेला; वंचित बहुजन आघाडीचे सरकारला सवाल

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Breaking News :  पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!
बातमी

Breaking News : पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

by mosami kewat
August 25, 2026
0

पुणे : मांजरी येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाची वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज...

Read moreDetails
धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

August 25, 2026
मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

August 25, 2026
मांजरी स्टड फार्म येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा; सुजात आंबेडकर आज विद्यार्थांची  घेणार भेट!

मांजरी स्टड फार्म येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा; सुजात आंबेडकर आज विद्यार्थांची  घेणार भेट!

August 25, 2026
जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश

जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश

August 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home