Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

फडणवीस सरकारने गुंडाळल्या 903 विकास योजना

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 6, 2025
in बातमी
0
फडणवीस सरकारने गुंडाळल्या 903 विकास योजना
       
मुंबई- राज्यातील तब्बल 903 विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला आहे. ज्या योजना वेळेत पुर्ण होऊ शकल्या नाहीत अश्या 903 विकास योजना बंद करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे.

भूसंपादनासंदर्भातील अडचणी, स्थानिक नागरिकांचा विरोध आणि काही ठेकेदारांकडून मिळणारे असहकार्य ही कारणे देत सरकारने या योजना गुंडाळल्या आहेत. या गोष्टींचा ग्रामीण महराष्ट्राच्या विकासावर मोठा परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. शासनाने या योजनांना अधिक वेळ देण्याऐवजी थेट त्यांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही वर्षांपासून या योजना रखडल्या होत्या. या योजनांची प्रत्यक्षात कोणतीही प्रगती झाली नसल्याने मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये लघुपाटबंधारे योजना, कोअर पाझर बंधारे, पाझर तलाव, साठवण तलाव दुरुस्ती योजना अशा अनेक योजनांचा समावेश आहे. या योजनांची अंमलबजावणी गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. मात्र सध्या या 903 योजना रद्द झाल्याने राज्यातील विकासात या निर्णयामुळे जिल्हा आणि तालुका स्तरावर काय परिणाम होतील, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Tags: bjpFadnavisgovernmentMaharashtraschemesup 903Vanchit Bahujan Aaghadiwrapped
Previous Post

शिवराज्याभिषेक सोहळ्यास रायगडावर लाखो शिवभक्त दाखल

Next Post

आदिवासी, सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 1,827 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला

Next Post
आदिवासी, सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 1,827 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला

आदिवासी, सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 1,827 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
शैक्षणिक संस्था की संस्थात्मक कत्तलखाने ?
article

शैक्षणिक संस्था की संस्थात्मक कत्तलखाने ?

by mosami kewat
September 21, 2026
0

- आकाश मनिषा संतराम  मुंबईतील नामांकित पवई आयआयटीच्या भिंतींआड साहिल वाकोडे या २२ वर्षीय तरुण विद्यार्थ्याने आपले आयुष्य संपवले. ही...

Read moreDetails
‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर

‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर

September 21, 2026
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

September 21, 2026
सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी महापौर-आयुक्तांची पाहणी; जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश

सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी महापौर-आयुक्तांची पाहणी; जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश

September 21, 2026
आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे – सुजात आंबेडकर 

आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे – सुजात आंबेडकर 

September 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home