मुंबई : काँग्रेसच्या जे पोटात होतं तेच ओठावर आलंय. वंचित बहुजन आघाडीला सोबत न घेण्याची भूमिका काँग्रेसने आधीच ठरवली असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिध्दार्थ मोकळे यांनी म्हटले आहे.
आम्ही अनेकदा सांगून, पत्र लिहून आमचा एकत्र येण्याचा मनोदय व्यक्त केला. मात्र आधीपासून काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला वगळण्याचा निर्णय घेतलेला असल्यामुळे आमच्या एकाही प्रयत्नाला काँग्रेसने आजवर प्रतिसाद दिला नाही. नाना पटोले पत्रकारांशी ऑफ द रेकॉर्ड जे बोलले ती भूमिका आधीपासून ठरलेली आहे. आता केवळ दिखावा करण्या पेक्षा काँग्रेसने महाराष्ट्राच्या जनतेला खरं काय ते सांगून टाकावं. असेही त्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रातील अनेक व्हॉटसअप ग्रुप्सवर वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेण्याबाबत नाना पटोले हे काय बोलले ? याविषयीची व्हॉट्सअप चॅट प्रचंड व्हायरल झाली. ही चॅट दोन पत्रकरांमधील खाजगीत झालेली बातचीत असल्याचं सांगितलं जातं आहे. यात नाना पटोले वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेणार नसल्याचं म्हटल आहे, असा आशय आहे.