पुणे : महायुती सरकार व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) कथित भ्रष्ट, भोंगळ आणि बिल्डरधार्जीण्या कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने सोमवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी विराट धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा ‘स्वाभिमानी’ मोर्चा काढण्यात येणार आहे.
सकाळी ११.०० वाजता म्हसोबा मंदिर, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर येथून या मोर्चाला सुरुवात होईल आणि तो एस.आर.ए. कार्यालय, पुणे येथे समारोप होईल.
एस.आर.ए. च्या माध्यमातून सुरू असलेल्या कथित गैरकारभाराचा निषेध करण्यासाठी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
यावेळी अॅड. प्रियदर्शी तेलंग (राष्ट्रीय महासचिव), डॉ. अनिल अण्णा जाधव (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष) आणि अॅड. सर्वजीत बनसोडे (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या मोर्चामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




