Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी-दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

mosami kewat by mosami kewat
August 20, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी-दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा
       

मुंबई : वरळी येथील माता रमाई आंबेडकर स्मशानभूमीतील अपुऱ्या आणि बंद असलेल्या सुविधांसह विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी – वरळी विधानसभा यांच्या वतीने गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ रोजी जी-दक्षिण मनपा विभागीय कार्यालय, नामजोशी मार्ग येथे तिरडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

वरळी येथील माता रमाई आंबेडकर स्मशानभूमी ही मुंबईतील जुनी आणि ऐतिहासिक स्मशानभूमी आहे. पूर्वी येथे एकाच वेळी १० ते १२ मृतदेहांवर लाकडावर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था होती. त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत नव्हता. मात्र, स्मशानभूमीचा विकास करून आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पारेख ट्रस्ट आणि जी-दक्षिण विभाग, मुंबई महानगरपालिका यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. तरीदेखील स्मशानभूमीची सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेल्या अनेक यंत्रणा बंद किंवा अपुऱ्या आहेत. धुराचे प्रदूषण, योग्य वायुवीजनाचा अभाव तसेच ऑक्सिजन आणि हवा खेळती राहण्याच्या व्यवस्थेतील त्रुटींमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील प्रकाशव्यवस्थाही अपुरी असून अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे संघटनेने म्हटले आहे.

याशिवाय, गार्डनच्या नावाखाली दफनभूमीसाठी उपलब्ध असलेली जागा कमी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कामगार आणि सुरक्षा रक्षकांची पुरेशी व्यवस्था नसल्याने परिसरातील सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. तसेच परिसरात गर्दुल्ले, अंमली पदार्थांचे सेवन करणारे आणि मद्यपान करणाऱ्या समाजकंटकांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिकांना सन्मानजनक, सुरक्षित आणि आरोग्यदायी अंत्यसंस्काराची सुविधा मिळत नसेल, तर या संपूर्ण विकासकामाची चौकशी करण्यात यावी. तसेच दोषी अधिकारी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

“मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी सन्मानजनक व्यवस्था करा” या प्रमुख मागणीसह जी-दक्षिण मनपा विभागाच्या कथित भोंगळ कारभाराविरोधात हा तिरडी मोर्चा काढण्यात आला. स्मशानभूमीतील सर्व समस्या तातडीने सोडवून नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चा मोठ्या संख्येने नागरिक आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते पदाधिकारी, आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. 


       
Tags: MaharashtraMata Ramai ambedkarPoliticalVanchit Bahujan AaghadiVarali protest
Previous Post

पैठणमध्ये अनमोल अहिरे हत्या प्रकरणातील आरोपीची जामिनावर सुटका; वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबाच्या पाठीशी

Next Post

पनवेल महानगरपालिकेच्या अनुसूचित जातींसाठीच्या बजेटबाबत वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा

Next Post
पनवेल महानगरपालिकेच्या अनुसूचित जातींसाठीच्या बजेटबाबत वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा

पनवेल महानगरपालिकेच्या अनुसूचित जातींसाठीच्या बजेटबाबत वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी
बातमी

हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

by mosami kewat
September 7, 2026
0

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, याची पाहणी...

Read moreDetails
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

September 7, 2026
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

September 7, 2026
तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा 'Gen-Z' कनेक्ट

तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट

September 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home