Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पनवेल महानगरपालिकेच्या अनुसूचित जातींसाठीच्या बजेटबाबत वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा

mosami kewat by mosami kewat
August 20, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पनवेल महानगरपालिकेच्या अनुसूचित जातींसाठीच्या बजेटबाबत वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा
       
पनवेल : वंचित बहुजन आघाडी, पनवेल महानगरच्या शिष्टमंडळाने आज पनवेल महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांची भेट घेऊन अनुसूचित जातींसाठीच्या बजेटसंदर्भात सखोल चर्चा केली. महानगरपालिका सभागृहात या विषयावर प्रश्न उपस्थित करणे तसेच बजेटबाबतची संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

तसेच सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात पनवेल महानगरपालिकेला एकूण किती निधी प्राप्त झाला आहे, त्यापैकी मागासवर्गीय समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी किती निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच हा निधी प्रत्यक्षात वापरण्यात आला आहे का, वापरला असल्यास तो कोणत्या विभागात आणि कोणत्या योजनांसाठी खर्च करण्यात आला, याबाबतही चर्चा करण्यात आली.

महानगरपालिकेकडे मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी निधी उपलब्ध असल्यास, तो निधी पनवेल महानगरातील विविध विभागांमधील मागासवर्गीय समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी प्रभावीपणे वापरण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने केली.

तसेच पनवेल महानगरातील वंचित बहुजन आघाडीचे विभागीय अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व कार्यकर्त्यांकडून त्यांच्या-त्यांच्या विभागातील मागासवर्गीय समाजासाठी आवश्यक असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती मागविण्यात आली आहे. या योजनांचा प्रस्ताव तयार करून महानगरपालिका सभागृहात मांडण्यात येईल आणि त्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड, महासचिव संतोष मजमुले, उपाध्यक्ष कविताताई वाघमारे, उपाध्यक्ष छायाताई शिरसाट, उपाध्यक्ष सतीश अहिरे, संघटक नारायण माळी, कोषाध्यक्ष चंद्रकांत नवगीरे सर, खांदा कॉलनी अध्यक्ष महेंद्र रोकडे, कळंबोली अध्यक्षा ॲड. सुनिता इंगळे, अत्तम मुजमुले यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: MaharashtraPanvelPanvel Municipal CorporationPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी-दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

Next Post

जालन्यात डॉ. नरेद्र दाभोळकर यांच्या १३ व्या स्मृतीदिना निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

Next Post
जालन्यात डॉ. नरेद्र दाभोळकर यांच्या १३ व्या स्मृतीदिना निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

जालन्यात डॉ. नरेद्र दाभोळकर यांच्या १३ व्या स्मृतीदिना निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा
बातमी

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

by mosami kewat
September 29, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित करण्यात आलेल्या इराण...

Read moreDetails
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

September 29, 2026
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

September 29, 2026
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home