Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अनिल कांबळे यांची ठाम भूमिका : मोबदला वाढविला तरी जमिनी देणार नाही; महामार्ग रद्द झालाच पाहिजे

mosami kewat by mosami kewat
August 16, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अनिल कांबळे यांची ठाम भूमिका : मोबदला वाढविला तरी जमिनी देणार नाही; महामार्ग रद्द झालाच पाहिजे
       
हिंगोली : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुरू असलेल्या विरोधाला अधिक तीव्रता आली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी कोणत्याही परिस्थितीत देणार नसल्याची ठाम भूमिका वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा समन्वयक अनिल कांबळे यांनी व्यक्त केली.

यावेळी आमदार बांगर यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला वाढवून दिला तर जमिनी द्याव्यात, अशी भूमिका मांडली. मात्र या भूमिकेला अनिल कांबळे यांनी आक्रमकपणे विरोध केला. “मोबदला कितीही वाढवून दिला तरी आम्ही आमच्या जमिनी देणार नाही. प्रश्न केवळ मोबदल्याचा नसून शेतकऱ्यांच्या शेतीचा, उपजीविकेचा आणि भवितव्याचा आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे,” अशी ठाम मागणी अनिल कांबळे यांनी केली.

Also Read : फक्त ध्वजारोहणासाठी पालकमंत्री नकोत; जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हवेत : वंचित बहुजन आघाडी

तसेच या प्रश्नावर पालकमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावे, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, शेतकऱ्यांच्या भावना आणि परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी शक्तिपीठ महामार्गाबाबत निर्णय होईपर्यंत हिंगोली जिल्ह्यात शेतीची मोजणी करू नये, अशी सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना दिली.

पालकमंत्र्यांच्या या निर्देशामुळे मोजणीच्या प्रक्रियेमुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अंतिम मागणी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचीच असल्याचे अनिल कांबळे यांनी स्पष्ट केले. “पालकमंत्र्यांनी निर्णय होईपर्यंत मोजणी करू नये, अशी भूमिका घेतली आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करणे हाच अंतिम निर्णय असला पाहिजे. शेतकऱ्यांच्या जमिनी देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही,” असे अनिल कांबळे यांनी स्पष्ट केले.

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी आणि वंचित बहुजन आघाडी ठाम असून, शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयासाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Tags: AgricultureExpresswayFarmerMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

राष्ट्रध्वज के अपमान को लेकर प्रकाश आंबेडकर का प्रधानमंत्री मोदी पर निशाना!

Next Post

वरळी: अरुणोदय क्रीडा मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!
बातमी

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

by mosami kewat
October 3, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटी आणि ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक आज पुणे येथे पार पडली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026
तरुणांचा राग रस्त्यावर का?

तरुणांचा राग रस्त्यावर का?

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home