Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वसमत येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी; ‘रमाई ग्रुप ऑटो युनियन’चा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

mosami kewat by mosami kewat
February 8, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वसमत येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी; ‘रमाई ग्रुप ऑटो युनियन’चा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
       

हिंगोली : त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीचे औचित्य साधून वसमत येथे (दि. ७) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे  माता रमाई ग्रुप ऑटो युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीत (VBA) जाहीर प्रवेश केला.

कार्यक्रमाची सुरुवात आणि अभिवादन कार्यक्रमाचा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. त्यानंतर माता रमाई यांच्या तैलचित्राचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. हा संपूर्ण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. (Ramai jayanti)

याप्रसंगी प्रमुख पाहुणे वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष राजु इंगोले, माजी जिल्हा महासचिव सिद्धांत गायकवाड, माजी संघटक रमेश भुजबळ, नेते आनंद खरे सर, युवा नेते राजु करवंदे आणि विकी मोरे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी माता रमाईंच्या जीवनावर प्रकाश टाकत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव राहुल करवंदे आणि युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण बाराहाते यांच्या नेतृत्वाखाली ‘माता रमाई ग्रुप ऑटो युनियन’च्या पदाधिकाऱ्यांनी पक्षात प्रवेश केला. मान्यवरांनी त्यांचे पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. (Ramai jayanti)

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवी डोंगरे (अध्यक्ष), करण ठोके (उपाध्यक्ष), विजय कांबळे (सचिव), साहेबराव खंदारे, सिद्धार्थ गायकवाड, विजय एंगडे, जगदीश देशमुख, सुनील डाके, संतोष पाचंगे, अमोल गायकवाड, रामा पोटभरे, खंडागळे मामा, तानाजी गायकवाड, शिरसाट दादा, मनोज गायकवाड, अज्जू भाई, श्रावण परसवाळे, अरविंद थोरात, राजू गायकवाड, बालाजी पाईकराव, रतन गायकवाड, राष्ट्रपाल आवटे, गणेश इंगवे आणि गंगाधर गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


       
Tags: Dr Babasaheb AmbedkarMaharashtraRamai JayantiVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

पुण्यात माता रमाई जयंती व वंचित बहुजन महिला आघाडीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Next Post

दलित विधवा महिलेचे घर बुलडोझरने पाडल्याचा निषेध; वंचित बहुजन आघाडीचे नागपुरात धरणे आंदोलन

Next Post
दलित विधवा महिलेचे घर बुलडोझरने पाडल्याचा निषेध; वंचित बहुजन आघाडीचे नागपुरात धरणे आंदोलन

दलित विधवा महिलेचे घर बुलडोझरने पाडल्याचा निषेध; वंचित बहुजन आघाडीचे नागपुरात धरणे आंदोलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी
बातमी

साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

by mosami kewat
April 12, 2026
0

भंडारा : साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात...

Read moreDetails
भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर

भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर

April 12, 2026
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

April 12, 2026
यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

April 12, 2026
परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

April 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home