Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दलित विधवा महिलेचे घर बुलडोझरने पाडल्याचा निषेध; वंचित बहुजन आघाडीचे नागपुरात धरणे आंदोलन

mosami kewat by mosami kewat
February 8, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
दलित विधवा महिलेचे घर बुलडोझरने पाडल्याचा निषेध; वंचित बहुजन आघाडीचे नागपुरात धरणे आंदोलन
       
नागपूर: कुही तालुक्यातील मालची येथे एका दलित विधवा महिलेचे ४० वर्षे जुने घर प्रशासनाने बुलडोझर लावून पाडले. या घटनेचा निषेध करण्यासाठी ‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने संविधान चौक येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. ही कारवाई विकास नसून ‘जातीय दहशत’ असल्याचा सांगितले. वंचित बहुजन आघाडीने दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

​नेमकी घटना काय?

​२३ जानेवारी रोजी बानोर ग्रामपंचायत हद्दीतील मालची गावात कुलवंता प्रेमदास बोरकर या विधवा महिलेचे वडिलोपार्जित घर अतिक्रमण निर्मूलनाच्या नावाखाली पाडण्यात आले. सरपंच बंडू नरुले आणि सचिव बी. बी. भोयर यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी केवळ घरच पाडले नाही, तर परिसरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात आली आणि कुटुंबाला जातीयवाचक शिवीगाळही करण्यात आली. १५ दिवस उलटूनही पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल न केल्याने संताप व्यक्त होत आहे. (Vanchit bahujan aghadi)

​जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या प्रमुख मागण्या:

​१)  सरपंच बंडू नरुले व सचिव बी. बी. भोयर यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावेत.

​२) पीडित महिला कुलवंता बोरकर यांना शासनातर्फे १० लाख रुपयांची मदत मिळावी.

​३) ज्या ठिकाणी घर पाडण्यात आले, त्याच जागेचा शासकीय पट्टा बोरकर कुटुंबाला देण्यात यावा.

​४) कारवाईच्या वेळी उपस्थित असलेल्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी.

​हे आंदोलन जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांच्या नेतृत्वात पार पडले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य कुशल मेश्राम, प्रा. अनिकेत मून, राहुल वानखेडे, शहराध्यक्ष मंगेश वानखेडे, महानंदा राऊत, अनिरुद्ध मडके, सी.सी. वासे यांसह भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Vanchit bahujan aghadi)

या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांची मोठी गर्दी होती. नागरिकांनी हातात फलक घेऊन दोषींवर कठोर ​कारवाईची मागणी केली. जर शासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेतली नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र बेमुदत आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Tags: Dr Babasaheb AmbedkarJusticeMaharashtranagpurNagpur protestRamai JayantiVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

वसमत येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी; ‘रमाई ग्रुप ऑटो युनियन’चा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

Next Post

कानपूरमध्ये १० कोटींच्या लॅम्बोर्गिनीचा थरार: तंबाखू व्यावसायिकाच्या मुलाने दुचाकीस्वाराला १० फूट हवेत उडवले

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home