Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कानपूरमध्ये १० कोटींच्या लॅम्बोर्गिनीचा थरार: तंबाखू व्यावसायिकाच्या मुलाने दुचाकीस्वाराला १० फूट हवेत उडवले

mosami kewat by mosami kewat
February 9, 2026
in बातमी, सामाजिक
0
कानपूरमध्ये १० कोटींच्या लॅम्बोर्गिनीचा थरार: तंबाखू व्यावसायिकाच्या मुलाने दुचाकीस्वाराला १० फूट हवेत उडवले
       
कानपूर : कानपूरमध्ये धक्कादायक घटना घडली. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका आलिशान लॅम्बोर्गिनी कारने रविवारी दुपारी  रस्त्यावर मोठा गोंधळ घातला. ग्वाल टोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत या आलिशान कारने उभ्या असलेल्या दुचाकीला आणि रिक्षाला जोरदार धडक दिली.

प्रसिद्ध तंबाखू व्यावसायिक के. के. मिश्रा यांचा मुलगा शिवम कुमार मिश्रा याने चालवलेल्या या कारने एका रिक्षेला आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार १० फूट हवेत फेकला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Kanpur lamborghini crime)

नेमकं काय घडलं?

रविवारी दुपारी ३:१५ च्या सुमारास रेव्ह-३ मॉल परिसरात हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दिल्ली पासिंगची ‘लॅम्बोर्गिनी रेव्ह्युएल्टो’ अत्यंत वेगात होती. त्या 

कारने सुरुवातीला एका रिक्षेला उडवले. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या ‘रॉयल एनफिल्ड’ला धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, तौफिक अहमद नावाचा तरुण दुचाकीसह १० फूट हवेत उडाला. दुचाकीला धडक दिल्यावर कार थांबली नाही, तर दुचाकीला फरफटत नेत थेट एका विजेच्या खांबाला धडकली. (Kanpur lamborghini crime)

जखमींची प्रकृती गंभीर

या अपघातात तौफिक अहमद गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर काही जणांनाही गंभीर फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर एक वेगळाच ड्रामा पाहायला मिळाला. शिवम मिश्रा याला वाचवण्यासाठी त्याच्या मागे दुसऱ्या कारमध्ये असलेल्या बाऊन्सर्सनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या लोकांशी हुज्जत घातली आणि गैरवर्तन केले. (Kanpur lamborghini crime)

यामुळे संतप्त झालेल्या जमावाने लॅम्बोर्गिनीच्या काचा फोडून कारची तोडफोड केली. आणि चालक शिवमला कारबाहेर ओढून काढले.

वातावरण तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनी मध्यस्थी करत शिवमला जमावाच्या तावडीतून सोडवले. सध्या ही १० कोटींची कार पोलिसांनी जप्त केली असून, पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

Tags: Crime newsKanpurKanpur lamborghini crimeVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

दलित विधवा महिलेचे घर बुलडोझरने पाडल्याचा निषेध; वंचित बहुजन आघाडीचे नागपुरात धरणे आंदोलन

Next Post

आरएसएसचे ‘सांस्कृतिक राजकारण’ देशाला विनाशाकडे नेणारे; ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
आरएसएसचे ‘सांस्कृतिक राजकारण’ देशाला विनाशाकडे नेणारे; ॲड. प्रकाश आंबेडकर

आरएसएसचे 'सांस्कृतिक राजकारण' देशाला विनाशाकडे नेणारे; ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा
बातमी

पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा

by mosami kewat
July 22, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये, नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे केंद्रीय शिक्षण मंत्री...

Read moreDetails
मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन !

मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन !

July 22, 2026
दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

July 22, 2026
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, शैक्षणिक संस्था, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे : इंजी. प्रशांत विराज इंगोले

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, शैक्षणिक संस्था, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे : इंजी. प्रशांत विराज इंगोले

July 22, 2026
२३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल उतरणार; शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांचे आवाहन

२३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल उतरणार; शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांचे आवाहन

July 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home