Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुण्यात माता रमाई जयंती व वंचित बहुजन महिला आघाडीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

mosami kewat by mosami kewat
February 8, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पुण्यात माता रमाई जयंती व वंचित बहुजन महिला आघाडीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
       

पुणे : त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती आणि वंचित बहुजन महिला आघाडी, कर्वेनगर शाखेचा वर्धापन दिन काल (७ फेब्रुवारी) रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या दुहेरी औचित्याने आयोजित कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘भीमकन्या’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे वंचित बहुजन महिला आघाडीच्या पुणे शहर अध्यक्षा अनिता चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेला पक्षप्रवेश. यावेळी अनेक महिला व युवकांनी वंचित बहुजन आघाडीच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवून पक्षात जाहीर प्रवेश केला. (Ramai jayanti)

उपस्थितांना मार्गदर्शन करताना अनिता चव्हाण यांनी माता रमाईंच्या संघर्षावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, आज महिला भगिनी जे सक्षम नेतृत्व करत आहेत, त्याची खरी प्रेरणा आपल्याला त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनातून मिळते. केवळ समाजकारण करून न थांबता, महिलांनी आता संघटित होऊन सत्तेत जाणे काळाची गरज आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी पक्ष सदैव पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. (Ramai jayanti)

या सोहळ्याला सारिका फडतरे (महासचिव, महिला आघाडी), निरंजना सोनावणे (संघटक), सागर आल्हाट (अध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी), रुक्मिणी दहिरे (अध्यक्षा, कर्वेनगर शाखा), राहुल दहिरे (आयोजक व ज्येष्ठ कार्यकर्ते), याशिवाय उपाध्यक्ष कांबळे, माणिक लोंढे, आशा निर्मळ, मीरा ढोकणे, धुरंधर भालशंकर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे नेटके नियोजन ज्येष्ठ कार्यकर्ते राहुल दहिरे यांनी केले होते. भीमकन्या पुरस्कार वितरण सोहळ्यामुळे महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. माता रमाईंच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.


       
Tags: MaharashtrapuneRamai JayantiVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

बिल्डर सुशील रहेजा प्रकरण: वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची अटक बेकायदेशीर ; न्यायालयाने पोलिसांना फटकारले!

Next Post

वसमत येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी; ‘रमाई ग्रुप ऑटो युनियन’चा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

Next Post
वसमत येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी; ‘रमाई ग्रुप ऑटो युनियन’चा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

वसमत येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी; 'रमाई ग्रुप ऑटो युनियन'चा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गाढे गव्हाण येथील गावगुंडांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
बातमी

गाढे गव्हाण येथील गावगुंडांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

by mosami kewat
May 23, 2026
0

जाफ्राबाद : जाफ्राबाद तालुक्यातील गाढे गव्हाण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर काही गावगुंडांनी १९ मे २०२६ रोजी हौदोस घातल्याची...

Read moreDetails
Aurangabad : दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

Aurangabad : दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

May 23, 2026
चार तासांची बैठक आणि जुमलेबाजी

चार तासांची बैठक आणि जुमलेबाजी

May 23, 2026
Nanded News: उन्हापासुन बचावासाठी ट्रॅफिक पोलिसांना छत्रीचे वाटप!

Nanded News: उन्हापासुन बचावासाठी ट्रॅफिक पोलिसांना छत्रीचे वाटप!

May 23, 2026
भारताने इस्रायलला लष्करी स्टील पुरवठा केल्यानेच इटलीने भारताची ४ जहाजे रोखली : ॲड. प्रकाश आंबेडकर

भारताने इस्रायलला लष्करी स्टील पुरवठा केल्यानेच इटलीने भारताची ४ जहाजे रोखली : ॲड. प्रकाश आंबेडकर

May 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home